1crime_33 
मराठवाडा

दरोडेखोरांनी वाहन अडवले; प्रवाशांना मारहाण करित लुटला सात लाखांचा ऐवज

दीपक बारकुल

येरमाळा (जि. उस्मानाबाद) : येरमाळा परिसरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.२८) मध्यरात्री दरोडेखोरांनी एका चारचाकी वाहनाला अडवले. प्रवाशांना चाकू, काठीने मारहाण करीत रोख रक्कम, मोबाईल, २० तोळे सोने, मनगटी घड्याळ असा एकूण सातलाख १२ हजार सहाशे रुपयाचा लुटून नेला ही घटना नाथवाडी पाटीजवळ घडली.

पंढरपूर येथील लाड कुटुंबीय अकोला येथे लग्नासाठी चारचाकीने (एमएच-१३, सीएस-७३०८) गेले होते. ते येडशीमार्गे पंढरपूरला परतत होते. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नाथवाडी पाटीजवळ वाहनाखाली काहीतरी वाजल्याचा आवाज आल्याने चालकाने वाहन उभे केले. यावेळी वाहनाखाली जॅक दिसला. दरम्यान, रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या अनोळखी सहाजणांनी चालकावर हल्ला केला.

चालकाला चाकू, काठ्याने मारहाण केली. शिवाय दमदाटी करून वाहनातील दोन महिला तीन पुरुषांकडे असणारे ३१ ग्रॅम सोन्याच्या सात अंगठ्या, दोन ४१ ग्रॅमचे गंठण, एक ३५ ग्रॅमची सोन्याची चैन, ७० ग्रॅम सोन्याचा हार, कानातले असे २० तोळे सोने, मोबाईल फोन आणि रोख ६१ हजार रुपये असा एकूण सात लाख बारा हजार सहाशे रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला.

या प्रकरणी निखिल विजय लाड (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीआधारे मंगळवारी सकाळी दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे करीत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन आणि उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकरण काशीद यांनी घटनास्थळाची पाहणी केली.



निवडला होता सोयीचा रस्ता
येरमाळा ते पंढरपूर रस्ता म्हणजे खामगाव-पंढरपूर रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे लाड कुटुंबीयांनी येडशी मार्गे पंढरपूरकडे जाण्याचा सोयीचा रस्ता निवडला. या रस्त्यावर येताच अवघ्या पाच मिनिटांत दरोडेखोरांनी त्यांचे वाहन अडविले. त्यामुळे या भागात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी मलकापूर येथील सुंदर लोमटे यांनी केली.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT