A shop owner has been charged with culpable homicide in a chemical blast case in Beed 2.jpg
A shop owner has been charged with culpable homicide in a chemical blast case in Beed 2.jpg 
मराठवाडा

केमिकलच्या स्फोट प्रकरणी दुकान मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

दत्ता देशमुख

बीड : प्लायवूडच्या दुकानातील केमीकलच्या स्फोट प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दुकान मालक नितीन भागवानदास लोढा याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. शनिवारी (ता. 19) पोलिस नायक रामराव आघाव यांनी फिर्याद दिली. शुक्रवारी (ता.18) झालेल्या स्फोटात एक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले होते.

हे ही वाचा : बीड - नगर लोहमार्गासाठी राज्याची तरतूद तुटपुंजी, प्रितम मुंडेंचा महाविकास आघाडीला टोला
 
शहरातील जिजामाता चौकातील चंपावती प्लायवूड या दुकानाच्या गोदामात हा स्फोट झाला. स्फोटाची तिव्रता येवढी होती कि, तरुणाचे दोन्ही हाताचे पंजे व पाय तुटून बाजूला पडले. तर, हादऱ्याने बाजूच्या इमारतीच्या काचेच्या खिडक्याही फुटल्या. एक किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज आला. अनिरुद्ध सर्जेराव पांचाळ (वय ३०, रा. सेलू, ता. गेवराई) असे स्फोटात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक, दहशतवादीविरोधी पथकासह श्‍वान पथकाने भेट देऊन तपासणी केली. काही वस्तू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी साधारण १२ वाजेच्या दरम्यान शहरातील मसरतनगर भागातील जिजामाता चौकातील चंपावती प्लायवूड या दुकानातील गोदामात असलेल्या हार्डनर या द्रवाच्या कॅनचा स्फोट झाला. स्फोटाची तिव्रता इतकी होती कि यात अनिरुद्ध पांचाळ हा थेट गोदामाच्या बाहेर रिक्षावर उडून पडला. त्याच्या दोन्ही हाताचे पंजे व पायाचे तुटून पडले. स्फोटाचे हादरेही दुरवरपर्यंत जाणवले तर आवाज एक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. हादऱ्याने बाजूच्या इमारतीच्या काचेच्या खिडक्याही तुटून पडल्या. 

घटनेची माहिती मिळताच शहर ठाण्याच्या पोलिसांसह दहशतवादीविरोधी पथक, श्‍वान पथक आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी धावले. या स्फोटाच्या हादऱ्यात गोदामाबाहेरील स्कुटी (एम.एच.२३ बी.ए.४८५०) आपोडाऊन खाली पडली तर बाहेर उभा असलेला रिक्षाचेही (क्रमांक एम. एच. २३ - ७१६६) नुकसान झाले. दरम्यान, रिक्षा चालक सुधीर जगताप व कामगार किसन मुणे जखमी झाले आहेत. दरम्यान शनिवारी या प्रकरणी चंपावती हार्डवेअर दुकानाचा मालक नितीन भगवानदास लोढा याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम आंत्रम करत आहेत.


संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT