accident 11 
मराठवाडा

बहिणीच्या लग्नाकरिता फटाके आणण्यासाठी गेला, तो 'गेलाच'

दिगंबर देशमुख

सिरसाळा (जि.बीड) : घरची गरिबी असलेल्या चव्हाण कुटुंबात तीन मुली आणि एकुलता एक मुलगा. पण सचिन पहिल्यापासून अभ्यासात हुशार आणि मेहनती. या बळावरच त्याचा वैद्यकीय शिक्षणासाठी (बीएएमएस) पहिल्या यादीत प्रवेश निश्‍चित झाला.

मात्र, बहिणीच्या लग्नासाठी लागणारे फटाके आणण्यासाठी गेलेल्या सचिनवर काळाने घाला घातला आणि डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्नही अधुरे राहीले. शिवाय बहिणीच्या डोक्यावर अक्षदाही टाकत्या आल्या नाहीत.

परळी-बीड मार्गावरील तपोवन पाटीजवळील पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (ता.९) सकाळी नऊच्या दरम्यान घडलेल्या अपघातात सचिन शिवाजी चव्हाण (वय २१) हा जागीच ठार झाला तर त्याचा चुलत भाऊ जखमी झाला. धारूर तालुक्यातील देवठाणा गावातील शेरी तांड्यावर या घटनेने शोककळा पसरली आहे.

या तांड्यावरील अंजली चव्हाण हिचा शनिवारी विवाह सोहळा होता. विवाह सोहळ्यासाठी लागणारे फटाके व इतर साहित्य आणण्यासाठी सचिन चव्हाण व त्याचा चुलत भाऊ नितीन आप्पासाहेब चव्हाण हे दोघे दुचाकीने (एम.एच.२० एफ. ६८९५) सिरसाळा गावाकडे निघाले होते.

याचदरम्यान, परळी-बीड रोडवरील तपोवन पाटीजवळून रिकामा ट्रॅक्टर (एम. एच. २१ ए. डी. ३७५) गावाकडे जात होता. येथे दुचाकी व ट्रॅक्टरची समोरासमोर जोराची धडक होऊन सचिन चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. तर नितीन हा गंभीर जखमी झाला. जखमीवर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर तांड्यावरील विवाह सोहळा साध्या पद्धतीने उरकण्यात आला.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT