Corona 
मराठवाडा

CoronaUpdate: जालन्याने गाठली साठी, पून्हा सहाजण पॉझिटीव्ह

महेश गायकवाड

जालना: जालन्यात कोरोना बधित रुग्णांमध्ये रविवारी (ता.२४ ) आणखी सहा रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकुण बाधितांचा आकडा साठ झाला. नवीन सहा रुग्णांमध्ये अंबड शहरातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीचा समावेश असून अन्य तीन हे जालना शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील कर्मचारी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

जालन्यात शनिवारी तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले त्यामुळे जिल्ह्याला थोडा दिलासा मिळाला असताना रविवारी पुन्हा सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.  या सहा रुग्णामध्ये तीन जण हे अंबडमधील नाईकवाडी येथील एकाच कुटुंबातील असून यापूर्वी या कुटुंबातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला होता.

तर उर्वरित तीन व्यक्ती जालना शहरातील नवीन जालना भागातील खासगी हॉस्पिटलमधील कर्मचारी असून  यापूर्वी या हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी आले आहे. त्यांच्या संपर्कात आल्याने या  तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली  आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ६० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रुग्णालयात ४७ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

औरंगाबादला दिलासा
औरंगाबाद जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली. गत दोन दिवसात अनुक्रमे ३२ व ३० रुग्णानंतर आज (ता.२४) २८ कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२७६ झाली आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

औरंगाबादेत आज आढळलेल्या रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)
न्याय नगर, गारखेडा (२), टाऊन हॉल (१), सईदा कॉलनी, जटवाडा रोड (३), कैलास नगर (४), राम नगर, एन-२, सिडको (४), नारळीबाग (१), गौतम नगर, जालना रोड (१), संभाजी कॉलनी, सिडको (१), महेश नगर (१), जुना बाजार (१), एमजीएम परिसर (१), भवानी नगर, जुना मोंढा (१), शंकुतला नगर, शहानूरवाडी (१), औरंगपुरा (२), आशियाद कॉलनी, बीड बायपास (१), वडगाव कोल्हाटी (२), अब्दाशहा नगर,सिल्लोड (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १३ महिला आणि १५ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT