संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

जालन्यातील अनेक उद्योगांना घरघर 

भास्कर बलखंडे

जालना -  येथील औद्योगिक क्षेत्रात मंदीचे सावट पसरले आहे. उत्पादनाला मागणी नसल्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. परिणामी निम्म्यापेक्षा अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून या क्षेत्रासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना पुरवाव्यात, अशी मागणी यानिमित्ताने पुढे येत आहे. 

जालना येथील औद्योगिक परिसरात लोखंडी सळया निर्मिती करणारे स्टील उद्योग तसेच अन्य छोटे-मोठे व्यवसाय आहेत. त्यामुळे अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला; शिवाय वसाहतींत दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रावर मंदीचे सावट पसरले आहे.

25 पेक्षा अधिक रोलिंग मिल बंद
जागतिक मंदीच्या परिणामामुळे कच्चा माल खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागतात, तर तयार केलेल्या मालाला देशभरातून मागणी नसल्यामुळे यातून उत्पादन खर्चही मिळत नसल्याने व्यवसाय तोट्यात जात आहेत. मालाला फारशी मागणी नसल्यामुळे 25 पेक्षा अधिक रोलिंग मिल बंद पडल्या आहेत. त्यातील काम करणाऱ्या अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. 

उद्योजकांना हव्यात सवलती 
उद्योजकांना जीएसटी मोठ्या प्रमाणावर भरावा लागतो. त्यामुळे व्यवसायात तोटा सहन करावा लागत आहे. जीएसटीमध्ये सवलत किंवा सूट द्यावी, पाणी, रस्ता, वीज आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विविध उद्योजकांतून केली जात आहे. 

जागतिक स्तरावरच मंदीचे सावट आहे. त्याचे परिणाम स्थानिक उद्योग क्षेत्रावर होणे साहजिकच आहे. सरकारने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्थानिक उद्योग, उद्योजकांना सवलती द्याव्यात, म्हणजे मंदीचा सामना करता येईल. औद्योगिक वसाहतींना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. 
- किशोर अग्रवाल, 
उद्योजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT