ppe kit 
मराठवाडा

तर सुरु ठेवणार खाजगी दवाखाने, कुठे ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा

वसमत ः ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वसमत येथील अनेक खासगी डॉक्टरांनी पर्सनल प्रोटेक्शन किटअभावी आपले रुग्णालय बंद ठेवल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे हाल होत असून सुरक्षेच्या उपाययोजना करून खासगी दवाखाने सुरू ठेवण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे.

‘कोरोना’ संसर्गाने देशभरात थैमान घातले असताना त्याचा नायनाट व रोखण्यासाठी शासन स्तरावर आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असताना मागील काही दिवसांपासून काही मोजके दवाखाने वगळता येथील खाजगी डॉक्टरांनी ओपीडी, आयपीडीसह दवाखानेच बंद ठेवल्याने उपचारासाठी रुग्णांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

महिला शासकीय रुग्णालयात जावे लागते
आज घडीला शहरात अंदाजे २५ ते ३० टक्के रक्तदाब व मधुमेहाचे रुग्ण असल्याचे दिसून येत असून यासाठी नियमित उपचार, औषधी, गोळ्या त्यांना घ्यावी लागते. परंतु, खासगी दवाखाने बंद असल्याने किरकोळ आजारी रुग्णांना सुद्धा उपचारासाठी शहरातून दोन किलोमीटर दूर असलेल्या महिला शासकीय रुग्णालयात जावे लागत आहे. दरम्‍यान, कारखाना रोडवरील एका महिलेचा रक्तदाब (लो-बीपी) झाल्याने त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी महिला रुग्णालय येथे उपचार करण्यात आले. परंतु, रविवारी (ता.पाच) घरी आल्यावर अचानक त्यांचा रक्तदाब पुन्हा कमी झाल्याने त्यांना झटके आल्याने वेळेवर उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

हेही वाचा - हिंगोलीत अडकलेल्या परप्रांतीयांसाठी लातुरातून धान्यसाठा
 
भीती बसल्याने कंपाउंडर, नर्स, कर्मचारी येइनात 
लोकांमध्ये ‘कोरोना’ची भीती बसल्याने रूग्णालयात काम करण्यासाठी कंपाउंडर, नर्स, कर्मचारी येत नाहीत. शिवाय पेशंटला रेफर करायचे असल्यास नांदेड येथील मोठे दवाखाने बंद असल्याने रुग्णाच्या अधिक उपचारासाठी अडचण भासत आहे. शिवाय डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून आधुनिक पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इकुमेंट) किट उपलब्ध होत नसल्याने नाइलाजास्तव डॉक्टरांना खासगी दवाखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

आधुनिक पीपीई कीट, पास उपलब्ध करून द्या 
शासनाने आधुनिक पीपीई कीट व डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पास उपलब्ध करून दिल्यास खासगी दवाखान्यात ओपीडी सुरू ठेवण्याचे आश्वासन डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष एम. आर. क्यातमवार यांनी दिले आहे. तसेच रुग्णालयात येताना रुग्णासोबत जास्त लोक न येता केवळ एकच जबाबदार व्यक्तीने यावे, असे आवाहन डॉ. क्यातमवार यांनी केले आहे. लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन डॉक्टरांच्या अडचणी सोडवण्याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : पाच दिवसांच्या तेजीनंतर सोने उतरले, चांदीची चमकही झाली कमी; तुमच्या शहरातील ताजा भाव काय? जाणून घ्या

Mumbai Traffic: प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद, 'असे' असतील पर्यायी मार्ग; अत्यावश्यक वाहनांसाठी विशेष सोय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे वित्तीय तूट नाही; उच्च न्यायालयामध्ये शासनाचे उत्तर, सरकार योजनेवर ठाम

Pune Weather: पुण्यात ढगाळ वातावरण; उन्हामुळे उकाडा वाढला, तापमान थोडेसे घटले

Stock Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; निफ्टी 70 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT