Vishnupuri.jpg 
मराठवाडा

.....तर शेतकऱ्यांचे नुकसान टळेल....कोण म्हणाले ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी विष्णुपुरी प्रकल्पाच्या दोन्ही तिरावरील एक्सप्रेस फिडरचा वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

नियोजन करुन निर्णय घ्यायला हवा होता 
एक्सप्रेस फिडरचा वीज पुरवठा बंद करण्यापूर्वी जलसंपदा विभाग व ऊर्जा विभागाने सर्व नियोजन करुन पुढील निर्णय घेणे अपेक्षित होते, असेही आमदार कल्याणकर यांनी निवेदनात म्हटले आहे. एप्रिल व मे महिण्यामध्ये नांदेड शहरासाठी लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून विष्णुपुरी प्रकल्पाच्या दोन्ही तिरावरील एक्सप्रेस फिडरचा वीज पुरवठा बुधवारी (ता. १५) मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला असून महावितरणच्या प्रशासनाने तसे कळविलेही आहे. 

अनेक गावातील शेतकऱ्यांचे नुकसान 
नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील सोमेश्वर, जैतापूर, रहाटी, नाळेश्वर, ढोकी, पिंपळगाव (को), बोरगाव, सुगाव (बु.), सुगाव (खु.), कोटतीर्थ, हस्सापूर, नसरतपूर या गावातील शेतकऱ्यांचे विष्णुपुरी जलाशयाच्या एक्सप्रेस फिडरचा वीज पुरवठा बंद केल्याने आर्थिक नुकसान होणार आहे. 

खताची मात्रा दिली, आता पाणी नाही
या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांना खताची मात्रा दिलेली आहे. परंतु त्यांना कोणतीही पूर्वसुचना न देता एक्सप्रेस फिडरचा वीज पुरवठा बंद केल्याने ते हतबल झाले आहेत. यंदा गोदावरी नदीला मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. याशिवाय अंतेश्वर व दिग्रस धरणात नांदेडसाठी पाणी राखीव ठेवण्यात आलेले आहे. असे असतानाही फिडरचा वीज पुरवठा बंद करणे योग्य वाटत नाही, असेही आमदार कल्याणकर यांनी या निवेदनात म्हटले आहे. 

तो पर्यंत वीज पुरवठा पूर्ववत करावा
जलसंपदा विभाग व ऊर्जा विभागाने सर्व नियोजन करुन पुढील निर्णय घेणे अपेक्षित होते असेही नमुद केले आहे. उपरोक्त बाबींचा विचार करुन पाण्याचे पुढील योग्य नियोजन करण्याच्या सुचना द्याव्यात व तोपर्यंत विष्णुपुरी जलाशयाच्या एक्सप्रेस फिडरचा वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्याबाबतचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी आमदार बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT