हिंगोली : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी, कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या अभ्यांगतांना मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला असून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सोमवारी (ता.१८) बैठकीत दिला.
जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ राधाबिनोद शर्मा यांच्या उपस्थितीत सोमवारी विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या वेळी अतिरिक्त ‘सीईओ’ डॉ. मिलिंद पोहरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, गणेश वाघ, नितीन दाताळ, आत्माराम बोंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जयराम मोडके, कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघमारे, प्रकाश वायचाळकर, शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे, संदीपकुमार सोनटक्के आदींची उपस्थिती होती.
६४ हजार मास्कची निर्मिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाउन, संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचत गट चालविण्यात येत आहेत. बचतगटामार्फत मोठ्या प्रमाणात मास्क निर्मिती करून गरजूंना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतापर्यंत ६४ हजार मास्कची निर्मिती करून ग्रामीण भागात ग्रामपंचायत मार्फत विक्री करण्यात आली.
दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा
आरोग्य विभागामार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १६ हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर बचत गटांना दिली होती. यापार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी बचत गटामार्फत तयार केलेले मास्क वापरण्याचे आवाहन ‘सीईओ’ शर्मा यांनी केले. याशिवाय जिल्हा परिषद परिसरात मास्क शिवाय कर्मचारी किंवा बाहेरील व्यक्ती आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
येथे क्लिक करा - परजिल्ह्यातून आलेल्या हजारोंमुळे हिंगोलीची चिंता वाढली...
रोजगार मिळून आर्थिक मदत होणार
बचत गटामार्फत मागणीनुसार मास्कचा पुरवठा करण्यात येईल. मास्कची किंमत केवळ १५ रुपये असून हे मास्क कापडी असल्यामुळे स्वच्छ धुवून पुनरवापर करता येतो. यामुळे लॉकडाउनच्या काळात बचत गटांना रोजगार मिळून आर्थिक मदत होणार असल्याचे असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे व्यवस्थापक श्री. मोडके यांनी सांगितले.
नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
सर्व विभाग प्रमुखांनी मास्क खरेदी करून कर्मचाऱ्यांना द्यावेत, असे आवाहन ‘सीईओ’ श्री. शर्मा यांनी केले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून ‘सीईओ’ श्री. शर्मा यांनी मंगळवारी व बुधवारी असे दोन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र, क्वॉरंटाइन केंद्र शाळा आदी ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित केंद्रात जाऊन पाहणी करण्याच्या सूचना ‘सीईओ’ शर्मा यांनी दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.