खुर्ची व टेबलावरदेखील पोत्यातील माती टाकून निषेध 
मराठवाडा

Video : अभियंत्याच्या टेबलावर टाकले माती व दगड

सकाळ वृत्तसेवा

परभणी : वांगी (ता. परभणी) या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांच्या संतापाचा बांध अखेर सोमवारी (ता. २३) सुटला. गावकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील माती व दगड पोत्यामध्ये भरून थेट पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यालयातच आणून टाकली. योजनेचे कार्यकारी अभियंता कार्यालयात नसल्याने त्यांच्या खुर्ची व टेबलावरदेखील पोत्यातील माती टाकून निषेध करण्यात आला.

परभणी तालुक्यातील वांगी या गावाकडे जाण्यासाठी १. ८०० मीटर लांबीचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. याची निविदा निघून गुत्तेदारास एक वर्षात काम पूर्ण करण्याचे आदेशही संबंधित विभागाने दिले. परंतु, या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे या गावाकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा या रस्त्यावरून जातांना छोटे मोठे अपघात होत असल्याने गावकऱ्यांनी या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जून महिन्यात उपोषणदेखील केले होते. परंतु, प्रशासन व संबंधित गुत्तेदारावर याचा काडीचाही परिणाम झाला नाही. संबंधित गुत्तेदारांना हे काम का थांबविले असे विचारले असता, त्यांनी राजकीय दबाव आल्याचे गावकऱ्यांना सांगितले. 

सहा महिन्यांचा उलटला कालावधी
या घटनेलाही सहा महिन्यांचा कालावधी उलटला असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी याचा राग काढण्यासाठी या रस्त्यावरील माती व दगड गोळा करून पोती भरली व ही पोती सोमवारी (ता. २३) सकाळी परभणीतील पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या कार्यालयात आणली. तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली त्यांनी आणलेली माती संपूर्ण कार्यालयात ओतून दिली. योजनेचे कार्यकारी अभियंता  यांच्या टेबलावर व खुर्चीवरदेखील माती टाकून रस्त्याचे काम रखडल्याचा निषेध केला.

२०१७ मध्ये झाले होते उद्‍घाटन
२०१७ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्ह्यातील विकासकामांचे उद्‍घाटन झाले होते. त्यात या रस्त्याचाही समावेश होता. परंतु, नंतर हे काम रखडले आहे.

...अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला शेण लावू 
येत्या आठ दिवसांत या गावाच्या रस्त्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा गावातील शेण आणून अधिकाऱ्यांच्या तोंडाला लावले जाईल. रस्ते बांधकामात ठरलेली वेळ व गुणवत्ता पाळावी, अशी आमची मागणी आहे.
- किशोर ढगे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, परभणी

 

हेही वाचा व पहा : Video : आगीत चार घरे भस्मसात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT