सौर वीज.jpg 
मराठवाडा

चौदा गावांच्या शेतीपंपांना दिवसा सौरवीज 

सकाळ वृत्तसेवा

लातूर : शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा आणि शाश्वत वीज पुरवठा देण्यासाठी मागील युती सरकारने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरू केली होती. या योजनेतून महात्मा गांधी जयंतीपासून (ता. दोन) निलंगा तालुक्यातील १४ गावांतील दीड हजारहून अधिक शेतीपंपांना वीजपुरवठा सुरू झाला आहे. या योजनेतून दिवसा आठ ते दहा तास अखंडित वीज पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप भोळे यांनी दिली.
 


शेतीपंप अर्थात कृषीपंपांना अखंडित वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यात विजेच्या भारनियमनामुळे रात्रीच्या वेळीही शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीज पुरवठा अखंडित होत नाही. शेतीपंपासाठी लागणाऱ्या विजेची समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी युती सरकारने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना हाती घेतली होती. या योजनेत सरकारी जागेवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाची उभारणी करून त्यातून शेतकऱ्यांना कमी दरात वीज पुरवठा करण्यात येणार होता. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात निलंगा तालुक्यातील अनसरवाडा व पानचिंचोली वीज उपकेंद्रासाठी ही योजना राबवण्यात आली. योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले. यातूनच शुक्रवारी योजनेतून वीज पुरवठ्याला सुरवात झाल्याचे श्री. भोळे यांनी सांगितले. अनसरवाडा वीज उपकेंद्रातील कृषी वाहिनीतून चार गाव शिवारात ५१६ शेतीपंपांना तर पानचिंचोली उपकेंद्रातून पानचिंचोली, गौर व तुपडी अशा तीन कृषी वाहिन्यांतून दहा गावांच्या शिवारातील एक हजार शंभर शेतीपंपांना सौर वीज पुरवठा सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना आता अखंडित वीज उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात आणखी काही भागात योजनेतून वीज पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. 

तरच योजना सुरू राहणार 
योजनेतून एक रुपये ६० पैसे युनिट दराने शेतीपंपांना वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. मात्र, ही योजना सुरू ठेवण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर आहे. सध्या पाच वाहिन्यांतून शेतीपंपांना वीज पुरवठा सुरू झाला तरी या वाहिन्यांवरून सौर वीज घेतलेल्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी नियमित वीजबिल भरले तरच योजना पुढे सुरू राहणार आहे. या अटीचे पालन न केल्यास योजनेतून सुरू असलेला सौर वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur President’s Rule Ends: वर्षभरानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात ; युमनाम खेमचंद सिंह घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ!

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपावर भाजपचे वर्चस्व! हिमगौरी आहेर-आडके यांचा अर्ज दाखल, पण 'ठाकरे' गटाच्या एन्ट्रीने लढत होणार

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये १४ फेब्रुवारीपर्यंत लोकांसाठी जमावबंदीची अंमलबजावणी

"आता मी कार्यक्रम करणार नाही" ट्रोलिंगनंतर गौतमीने घेतलेला निर्णय ; त्या कठीण काळाविषयी म्हणाली..

Bagless Days: विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय! सरकारी शाळांमध्ये 'बॅगलेस डे' लागू; राज्य सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT