सोयाबीन 
मराठवाडा

सोयाबीनच्या भावात तीनशे रुपयांनी घसरण, शेतकऱ्यांना बसणार फटका

खाद्य तेलाच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने आयात होणाऱ्या कच्च्या तेलाचा आयात कर आणि कृषी अधिकभार पुढील वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचा फटका तातडीने सोयाबीनच्या भावावर बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : खाद्य तेलाच्या (Edible Oil) वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने आयात होणाऱ्या कच्च्या तेलाचा आयात कर आणि कृषी अधिकभार पुढील वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचा फटका तातडीने सोयाबीनच्या भावावर (Soybean Price) बसला आहे. राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या लातूर बाजारपेठेत तीनशे रुपयांनी सोबायीनचा दर कोसळला आहे. एकीकडे सणासुदीत ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र शासनाने केला असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसला आहे. सध्या दसरा दिवाळीचा सण आहे. यात खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ झालेली आहे. ग्राहकांत शासनाबद्दल तीव्र असंतोष आहे. हे लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने खाद्य तेलावरील (Latur) आयात कर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यातून ग्राहकांना सणासुदीच्या दिवसात दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच सणासुदीच्या दिवसात शेतकरी आपला शेतमाल आडत बाजारपेठेत आणत आहे. यात येथील बाजारपेठेत तर सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक आहे. रोज २५ ते ३० हजार क्विंटलची आवक होत आहे.

गेल्या वर्षी कधी नव्हे ते सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपये क्विंटलपर्यंत गेला होता. चालू हंगामात सोयाबीनला सात ते आठ हजार रुपये भाव राहिल असे शेतकऱ्यांना वाटत होते. पण, हंगामाच्या सुरवातीपासूनच भाव कमी झालेले आहेत. गेली काही दिवस साडेचार हजार ते सहा हजाराच्या घरात भाव राहिले आहेत. त्यात केंद्र शासन वेगवेगळे निर्णय घेत असल्याने त्याचा फटका भावावर होत आहे. खाद्य तेलावरील आयात रद्द करण्याचा निर्णय होताच गुरुवारी (ता.१४) येथील बाजारपेठेतील सोयाबीनचा भाव तीनशे रुपयांनी कोसळला. ऐन सणासुदीत शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसताना दिसत आहे.

आकडे बोलतात

--------

तारीख-----कमाल दर------किमान दर---सर्वासाधारण दर

१४ ऑक्टोबर---५,५२६-----४,४००--------५,३४०

१३ ऑक्टोबर----५,८०२-----५,८००------५,६६०

१२ ऑक्टोबर--५,६५२---------४,४००-------५,४५०

कच्च्या खाद्य तेलावरील आयात रद्द करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. यात तेलाचे भाव कमी होऊन ग्राहकांना फायदा होईल. पण, त्याच बरोबर सोयाबीनच्या भावावर परिणाम झाला आहे. एकाच दिवसात अडीचशे ते तीनशे रुपयांनी भाव घसरले आहेत. यात शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे.

- ललित शहा, सभापती, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harman Investment Pune : पुण्यात होणार तब्बल ३४५ कोटींची गुंतवणूक; ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळणार नोकऱ्या

New Year Horoscope Prediction : कोण होणार मालामाल आणि कुणाचं होणार नुकसान ? जाणून घ्या राशीनुसार नव्या वर्षाचं राशीभविष्य

Why is SIR Important: भारतात एसआयआर महत्त्वाचे का आहे? निवडणूक आयोगाने चार मोठी कारणे सांगितली!

Mokhada News : सकाळ बातमीचा परिणाम! नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी शेतात.

Bhayandar accident : भाईंदर खाडी परिसरात 'चंदीगड एक्सप्रेस'मधून प्रवासी पडला; रेल्वे प्रशासनाकडून चौकशी होणार!

SCROLL FOR NEXT