Nanded News 
मराठवाडा

अध्यात्माला दिली सामाजिकतेची झालर

प्रमोद चौधरी

नांदेड : जुना कौठा येथील भाविक नियमित अभंग गायनातून भक्ती करीत आहेत. एवढेच नाही तर त्याला सामाजिकतेचीही झालर दिली आहे. चार वर्षापासून सामुदायिक तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन करून गरीब कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न नृसिंह मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने लावून देतात. आजवर आठ जोडप्यांच्या रेशीमगाठी जुळविण्यात जुना कौठ्यातील नागरिकांना यश आले आहे.

जुना कौठा येथे सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे नृसिंहाचा अवतार असलेल्या नरोबाचे मंदिर आहे. सदर मंदिर हे कौठावासियांचे ग्रामदैवत आहे. २००५ मध्ये या मंदिरचा येथील नागरिकांनी जीर्णोद्धार केला. ‘डाक’ वाजविल्याशिवाय कुठल्याही शुभकार्याला सुरवात केली जात नाही. नृसिंह जयंतीनिमित्त वैशाख शुक्ल पक्ष अष्टमीला भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाला सुरवात होते. पौर्णिमेला नृसिंह जयंती उत्सव साजरा होतो. या काळात दररोज पहाटे पाच ते साडेसात काकडा भजन होते. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये गरीब कुटुंबातील तसेच अनाथ मुला-मुलींचे लग्न लावून देण्याची प्रथा २०१३ पासून सुरु करण्यात आली. आजवर आठ कुटुंबांचे ऋणानुबंध या माध्यमातून जुळविण्यात आले.

हेही वाचा‘या’ शहराचा कारभार चालतोय रामभरोसे
 
सर्व सण-उत्सव एकत्रित होतात साजरे
या उपक्रमांसाठी नृसिंह भजनी मंडळाला मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गंगाप्रसाद काकडे, सचिव मारोतराव पासवाड, उपाध्यक्ष राजीव गोरे यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्यानेच हे शक्य होत असल्याचे पुजारी स्वामी शंकर सुंभय्या यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. शिवाय प्रत्येक एकादशीला भजन, द्वादशीला पाचशेवर लोकांना अन्नदान, नागपंचमी, महाशिवरात्री, गोकुळाष्टमी आदी सण-उत्सवही मोठ्या प्रमाणावर पारंपरिक पद्धतीने साजरे होतात.

यांचा आहे मंडळात समावेश
मंडळामध्ये स्वामी शंकर संभय्या अप्पा, भगवान होपळे, खुशालराव कंदुरके, प्रकाश शिंदे, माधवराव शेळगावकर, रघुनाथ चापोले, अंकुश जाधव, माधव दंडे, राम फुलवळे, गणेश नामेवार, रंगराव शिंदे,राम फुलवळे, धोंडिराम गोरगे, नागनाथ बोडखे, आनंदा धोंडगे, रत्नाकर जाधव, बाबू स्वामी, मारूती पासवाड, ज्योती शंकर स्वामी, मीना धोंडगे, शालिनबाई शेळगावे, गोदावरी मारकवाड, सुलोचना मोदीराज, मीरा स्वामी आदींचा समावेश आहे.

मराठवाड्यात येथे आहेत नसिंहाचे मंदिर                                               

हिंदू धर्मातील मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्फी हे विष्णूचे दशावतार आहेत. मराठवाड्यात जुना कौठा (नांदेड), राहेर (ता.बिलोली), पोखर्णी आणि पिंगळी (जि.परभणी), या ठिकाणी नृसिंहाचे मंदिर आहे. पिंगळी येथील मंदिरात उडत्या गरुडाच्या पाठीवर बसलेली नृसिंहाची मूर्ती आहे. राहेर येथील मंदिर गोदावरीच्या दक्षिण तिरावर असल्याने महत्त्व आहे. याशिवाय वेरुळच्या १५ व १६ व्या लेण्यांत नृसिंह-हिरण्यकश्‍यपू युद्धाचा प्रसंग दर्शविलेला आहे. धर्मपुरी (जि.बीड) येथील केदारेश्‍वराच्याही मंदिरात नृसिंहाचे शिल्प आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT