ST Viral Video sakal
मराठवाडा

ST Viral Video: एसटीने आडूळला घेतला नाही थांबा, कंटक्टर आणि प्रवाशात झाली हाणामारी , गुन्हा दाखल

अनेकदा आडूळ ,पाचोड व परिसरातील नागरिकांनी वरिष्ठांना निवेदन देऊन आडूळ गावांतील थांबा अनिर्वाहय करण्याची मागणी केली.

हबीबखान पठाण

Pachod News: विद्यार्थ्यांसह प्रवाशांना घेऊन आडूळ (ता.पैठण) गावांत न जाता बाहेरूनच चालक - वाहक बायपास शोधत असल्याने दररोज प्रवाशी व त्यांच्यात खडाजंगी होऊन वाद वाढत असल्याचे चित्र धुळे - सोलापूर महामार्गावर पाहवयास मिळत असून आडूळचा 'थांबा' न घेण्याच्या कारणावरून विद्यार्थ्यासह प्रवाशांसोबत महिला वाहकाने हुज्जत घातल्याने त्याचे मारहाणीत पर्यावसन झाल्याची घटना पाचोड (ता.पैठण) येथे मंगळवारी (ता.नऊ) सकाळी घडली असून पोलिसांनी एका प्रवाशाविरुद्ध लोकसेवकास मारहाण केल्याप्रकरणी नवीन कायद्यान्वये पहीला गुन्हा दाखल केला.

यासंबधी अधिक माहिती अशी, धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने पाचोडमार्गे दररोज दोनशे ते अडीचशे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांना घेऊन धावतात. आडूळ (ता.पैठण) चे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पाचोड व छत्रपती संभाजीनगर येथे ये- जा करतात, तर पाचोड व परिसरातील विद्यार्थी आडूळ व छत्रपती संभाजीनगरला जातात. पुर्वीपासून प्रत्येक बस आडूळचा थांबा घेत असत.

परंतु या रस्त्याचे चौपदरीकरण होऊन आडूळ येथे बायपास (बाह्ववळण) झाल्याने अर्धेनिम्म्या बसेस आडूळ गावांत जाण्यास टाळून 'बायपास'चा वापर करतात. प्रवाशांचा गावांतून जाण्यासाठी आग्रह असला तरी ते प्रवाशांच्या आग्रहाला न जुमानता आडूळचे प्रवाशी न घेता निघून जातात. यांत शिक्षणासाठी ये - जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यावरून विद्यार्थी, प्रवाशी व चालक -वाहकांत अनेकदा वाद होतात. अनेकदा आडूळ ,पाचोड व परिसरातील नागरिकांनी वरिष्ठांना निवेदन देऊन आडूळ गावांतील थांबा अनिर्वाहय करण्याची मागणी केली.

मंगळवारी (ता.नऊ) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आडूळ येथे शाळेत जाण्यासाठी परिसरातील बरेच विद्यार्थी - विद्यार्थीनी पाचोडच्या बसस्थानकावर बसची प्रतिक्षा करत थांबले असताना अंबाजोगाई - छत्रपती संभाजीनगर बस (क्र. एम एच२० बी एल २८०४) ही बस आली.

यांत विद्यार्थ्यासह काही प्रवाशी आडूळला जाण्यासाठी बसले असता महिला वाहक सविता आदिनाथ तोंडे यांनी त्यांना आडूळला गाडी थांबणार नसल्याचे सांगून खाली उतरण्याचा सल्ला दिला. यांत अर्धा-पाऊण तास विद्यार्थी व त्यांच्यात गोंधळ चालला.

एवढयात पाचोडहून आडूळला जाणेसाठी बसमध्ये बसलेला अमोल जगनाथ डूकळे याने खाली उतरण्यास नकार देऊन बसमधील चाललेल्या गोंधळाचा मोबाईलमध्ये व्हिडीओ घेण्यास सुरुवात केली. तोच महिला वाहक सविता तोंडे यांनी व्हिडीओ घेण्यास विरोध करून 'त्या' प्रवाशाच्या श्रीमुखात भडकावली.

त्यानंतर संतापलेल्या विद्यार्थासह अमोल डूकळे यांनीही महिला वाहकांस चोप दिला. तब्बल तीन तास हा गोंधळ चालला. दुपारी दोन वाजता महिला वाहक सविता तोंडे हिच्या तक्रारीवरून अमोल डूकळे (रा. पाचोड) याचे विरुद्ध शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे करीत आहे. याप्रकरणी आडूळ गावांत बस न थांबल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा विद्यार्थ्याच्या पालकांनी इशारा दिला असून वाहतूक नियंत्रकाकडे निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Election : प्रमुख पक्षांपुढे बंडखोरांचे आव्हान! उमेदवारी नाकारल्याने अनेक जण आक्रमक; नेतृत्वाची डोकेदुखी वाढली

Mumbai: वांद्रे टर्मिनसमध्ये मोठे अपडेट! तीन नवीन ट्रॅक बांधणार, लोकल ट्रेनची संख्या अन्...; नवे बदल कोणते?

Sahyadri Mountaineering: 'सह्याद्रीतील दुर्गम गूळाच्या ढेपा सुळक्यावर यशस्वी चढाई'; सुधागड तालुक्यातील गिर्यारोहकांची उल्लेखनीय कामगिरी!

IPL 2026 मधील हकालपट्टीनंतर Mustafizur Rahman च्या मदतीला धावला पाकिस्तान; कवडी भावात PSL मध्ये खेळणार

Mumbai BMC Election: 'शिवसेना भवन'ची धुरा मनसेच्या खांद्यावर, तर शिवाजी पार्क राखण्याचे उद्धव ठाकरेंपुढे आव्हान

SCROLL FOR NEXT