santosh Bangar 
मराठवाडा

घरी रहा, सुरक्षीत राहा, प्रशासनाला सहकार्य करा : आमदार संतोष बांगर

सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी (जि. हिंगोली) : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव भारतात व महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेला असतांना तो रोखण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने ठोस पावले उचलली जात आहेत. हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्‍याचे पालन करीत घरी रहा, सुरक्षीत राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे. 

राज्यात संचारबंदी लागू झाल्याने त्‍याचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. जिल्‍ह्यात देखील प्रशासन सज्‍ज असून ते सांगत असलेल्या नियमांचे पालन करावे. सध्या ग्रामीण भागात कामानिमित्त बाहेर गावावरून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्‍यांनी बाहेर गावावरून आल्याची नोंद आपल्या ग्रामपंचायत प्रशासन किंवा आरोग्य विभागाकडे करणे गरजेचे आहे. 

आठ जणांचे अहवाल निगेटीव्ह

जर कोणाला कोणताही आजार असेल तर त्‍याची देखील तपासणी करून घ्यावी. सर्वांच्या काळजीसाठी उपाय योजना केल्या जात आहेत. त्‍यामुळे याकडे सर्वांनी लक्ष देऊन प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे. जिल्‍ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत तपासणी केलेल्या आठ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्‍यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. 

कुटुंबाची सर्वांनी काळजी घ्यावी

परंतु, दक्षता बाळगणे गरजेचे आहे. एका ठिकाणी जमा होवू नका, कोणीही विनाकारण घराच्या बाहेर पडू नये व नियमांचे उल्लंघन करू नये. घाबरून न जाता स्वतःची व आपल्या कुटुंबाची सर्वांनी काळजी घ्यावी व राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.

जर्मनी येथून आलेल्या एकावर होम क्वारंटाईन

कळमनुरी : शहरामधील काझी मोहल्ला भागातील युवक मागील काही वर्षांपासून नोकरीनिमित्त जर्मनी येथे वास्तव्याला आहे. हा युवक मागील पंधरवड्यात भारतात परतला. पंधरा दिवसांपासून हा युवक कळमनुरी येथे त्याच्या घरी वास्तव्याला आहे. मात्र, परदेशाहून परत आलेले नागरिक व कोरोना संसर्गजन्य आजाराची पार्श्वभूमी पाहता जर्मनीहून परतलेल्या युवकाची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली होती. 

शनिवारी हातावर शिक्का मारून घेतला

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधित युवकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत युवकांचे कुटुंब, नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने जर्मनीहून परतलेल्या युवकाना होम क्वारंटाईन स्वीकारण्याची सूचना केली. सदरील युवकांच्या कुटुंबीयांना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे पटल्यानंतर विदेशातून परतलेल्या युवकाने शनिवारी हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घेतला. त्याची मुदत शुक्रवारी (ता. २७) संपुष्टात येत आहे. या युवकाला घरामध्ये एका स्वतंत्र खोलीमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

वाकोडीच्या रुग्णावर उपचार 

या दरम्यान, आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी नियमितपणे या कुटुंबाची भेट घेऊन सदरील युवकाच्या आरोग्याच्या नोंदी घेत असल्याचे सांगण्यात आले. तसेच तालुक्यातील वाकोडी येथील युवक नागपूर येथून कळमनुरी येथे परत आला आहे. त्याने उपजिल्हा रुग्णालयात जाऊन आपण नागपूर येथे कोरोना संसर्गजन्य रुग्णाच्या संपर्कात आल्याचे सांगितल्यामुळे त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या युवकासंदर्भात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून या युवकाला होम जर्मनी येथून आलेल्या एकावर होम क्वारंटाईन करायचे किंवा विलगीकरण कक्षात ठेवायचे, या बाबत वाकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT