जालना : कोरोनामुळे सध्या स्टील कारखान्‍यातील शुकशुकाट.  
मराठवाडा

जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद 

उमेश वाघमारे

जालना - स्टील उद्योगामुळे जालना शहराची जगभरात ओळख निर्माण आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू केल्यानंतर जालन्याच्या उद्योग इतिहासात प्रथमच स्टील उद्योग पूर्णपणे बंद झाला आहेत. त्यामुळे भविष्यात उद्योगाला शेकडो कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात पूर्णपणे लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे जालना येथील स्टील उद्योग ही ठप्प झाला आहे. जालना येथील स्टील महाराष्ट्रासह देशात आणि जगभर निर्यात केले जाते. या स्टील उद्योगामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो.

मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जालना येथील स्टील कंपन्यांनी सरकारच्या आवाहनास साथ देत उत्पादन बंद केले आहे. तसेच सर्व कर्मचारी, कामगार यांना सुटी देण्यात आली असून कंपन्यांनी त्यांना रेशन, पैसे पुरविले आहेत. 
दरम्यान जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद ठेवल्याने स्टील उद्योजकांना शेकडो कोटींचा फटका सहन करण्याची वेळ येणार आहे. या तोट्यातून सावरण्यासाठी भविष्यात स्टील उद्योगाला शासनाच्या मदतीचा हाताची गरज भासणार आहे, यात शंका नाही. 

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून सर्व स्टील उद्योग प्रथमच बंद ठेवण्यात आला आहेत. कंपन्या बंद असल्या तरी वीज बिल, बँकाचे हप्ते, कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू राहणार आहे, त्यामुळे स्टील उद्योगाला भविष्यात आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागेल. 
नितीन काबरा, पोलाद स्टील,जालना 

केंद्र आणि राज्य शासनाच्या आवाहनाला साथ देत जालना येथील सर्व स्टील उद्योग बंद ठेवला आहे. यामुळे आर्थिक संकट येणार आहे, पण सध्याच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला आहे. 
-घनश्याम गोयल, कालिका स्टील , जालना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Dhyaneshwar Katke Accident : बालिकेच्या अपघातात आमदार ज्ञानेश्वर कटकेंची चूक होती का? दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप, काय घडलं नेमकं?

मोठा दावा : "रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याशिवाय टीम इंडिया २०२७ चा वर्ल्ड कप जिंकू शकत नाही!"

Pune: लोणी काळभोरमध्ये स्फोट! महिला गंभीर जखमी, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल

Latest Marathi News Live Update: मेट्रोची कामांमुळे मुंबई प्रदूषणाच्या पातळीत वाढ - मिहिर कोटेचा

Nashik Politics : नाशिकच्या 'दुबई वॉर्ड'मध्ये राजकीय भूकंप! बालेकिल्ला असूनही मविआला उमेदवार मिळेना; कारण...

SCROLL FOR NEXT