file photo 
मराठवाडा

कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करा; खासदार हेमंत पाटील यांनी भरला महावितरणच्या अधिकाऱ्यांना दम

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांचा आणि शेतीचा वीज पुरवठा महावितरण कंपनी खंडीत करीत असल्याच्या ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीवरुन खासदार हेमंत पाटील यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्याशी याबाबत चर्चा करुन कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

वीज वितरण कंपनीने मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कृषिपंप आणि गावांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावल्याने अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे तक्रारी आणि धाव घेतल्यानंतर खासदार पाटील रविवारी (ता. १४) वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता जाधव यांच्याशी चर्चा करुन कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा असे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना थकीत वीजबिलापोटी सवलत देऊन देऊन चालू बिलाची बाकी भरणा केल्यास वीजपुरवठा सुरळीत करावा असे म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील वीज वितरणाबद्दल चर्चा झाली.

वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे पाण्याअभावी पिके वाळण्याची भिती

जिल्ह्यातील कृषिपंपाची शेकडो कोटींची थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम दोन दिवसापासून सुरु आहे. शेतीला होणारा वीजपुरवठा खंडित केला जात असून शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही. सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून शेतात गहू, हरबरा, भुईमूग पीक उभे आहे. वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे पाण्याअभावी पिके वाळण्याची भिती निर्माण झाली आहे.  तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. एकीकडे शेतातील पिकांना पाणी देता येईना अन दुसरीकडे अनेक गावात वीज पुरवठ्याअभावी पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी व सर्वसामान्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. 

बिलाचा भरणा केल्यास वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन

याबाबत अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष भेट घेऊन या अडचणीतून तोडगा काढण्याची मागणी केली. त्यांनतर खासदार हेमंत पाटील यांनी महावितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांशी चर्चा केली. यावेळी अभियंता श्री. जाधव यांनी चालू बिल बिलाचा भरणा केल्यास वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. खासदार हेमंत पाटील यांनी कृषिपंप वीजपुरवठ्याबाबत खंबीर भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात आला छोटा डॉन

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

BBM 6 UPDATE:'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का

SCROLL FOR NEXT