Nanded News
Nanded News 
मराठवाडा

नांदेड जिल्ह्याच्या चेकपोस्टवर आता होणार कडक तपासणी  

सकाळ वृत्तसेवा

नांदेड :  इतर जिल्ह्यातून व राज्य सिमेवरुन कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण नांदेड जिल्हयात प्रवेश करु नये म्हणून चेकपोस्टवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विनाकारण काही बहाणे करून आलेल्या नागरिकांच्या तपासणीसाठी जिल्हा व राज्य सिमेवर लावलेल्या २५ चेकपोस्टवर इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनचे वाटप करण्यात आले.

जिल्ह्याच्या सिमेवर २५ चेकपोस्ट
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या काळात नांदेड जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातून नांदेड जिल्हयात विनाकारण कोणतेही वाहन व लोकांनी प्रवेश करू नये म्हणून चेकपोस्ट उभारण्यात आलेले आहे. नांदेड जिल्हयाच्या सिमेवर १० आंतरजिल्हा चेकपोस्ट व १५ आंतरराज्य सिमा बंद करण्यात आलेले आहे. या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून येणाऱ्या-जाणाऱ्यांची कडक तपासणी केली जात आहे.  

चेकपोस्टवर होणार कडक तपासणी
तपासणी दरम्यान कुठलीही कसर राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी इन्फ्रारेड थर्मामीटर मशीन्स चेकपोस्टवरील पोलिसांना उपलब्ध करून दिल्या आहेत. इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनचे आंतरजिल्हयातून किंवा आंतरराज्यातून नांदेड जिल्हयात प्रवेश करणाऱ्या अत्यावश्यक सेवेमधील लोकांचे चेक पोस्टवर या मशीनने तापमान तपासणी केली जाणार आहे. सध्या नांदेड जिल्हा कोरोना मुक्त असून बाहेर राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना तपासण्यात येणार असून चेक करते वेळी कोणास तापाचे लक्षण असल्यास त्यांना नांदेड जिल्हयात प्रवेश नाकारला जाणार असल्याचे, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले आहे.

संचारबंदीचे पालन करावे
नांदेड जिल्हयातील नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नये. शासनाने लॉकडाऊन व संचारबंदीचा कालावधी वाढविलेला असल्याने जनतेने त्यांच्या घरातच रहावे, कोणीही विनाकारण बाहेर पडू नये. बहाणे करून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्‍यकच असेल तेव्हाच बाहेर पडावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनीयावेळी केले.

यांची होती उपस्थिती
गुरुवारी इन्फ्रारेड थर्मामीटर मशीन्सच्या वाटपप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) डॉ. धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, धनंजय पाटील, बाळासाहेब देशमुख, किशोर कांबळे, मंदार नाईक, विलास जाधव, रमेश सरवदे, बी.मुदीराज, सुनिल पाटील व पोनि देशपांडे, चिखलीकर, जनसंपर्क अधिकारी रामेश्वर कायंदे व अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT