Nanded News 
मराठवाडा

महापोर्टल विरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा

नांदेड :  अनेक दिवसांपासून महापोर्टल विरोधात विद्यार्थी अक्रमक होत असून, सोमवारी (ता.१६) नांदेड शहरातील विद्यार्थ्यांनी महापोर्टल कायमचे बंद झालेच पाहिजे, असा नारा देत शहरातुन महाआक्रोश मोर्चा काढला.  दरम्यान मोर्चातील काही विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी आयटीआय चौकातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यला अभिवादन करून आक्रोश मोर्चाला सुरुवात केली. आयएएस दर्जाच्या परीक्षेसाठी शासन महापोर्टल वापरत नाही; मग क्लास थ्रीच्या परीक्षेसाठीच महापोर्टल का? असा सवाल विद्यार्थ्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.

विद्यार्थ्यांचा अधिक अंत न बघता पूर्वी प्रमाणेच पोलीस भर्ती करावी. महापोर्टल परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, प्राध्यापक, शिक्षकांच्या रिक्तजागा त्वरीत भराव्यात, संयुक्त परीक्षा रद्द करण्यात यावी अशा विविध मागण्याही मोर्चातील विद्यार्थ्यांनी केल्या.

घोषणांनी वेधले लक्ष
महा पोर्टल विरोधात महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा शिवाजीनगर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एकत्र येत आक्रोश मोर्चा काढुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी प्रचंड घोषणा बाजी करुन सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते.
 
खासदार महिलेनीही केली होती मागणी  
परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट असतो. मात्र नेमक्या याच वेळी महापोर्टलमुळे जर विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असेल तर, मग हे महापोर्टल काय उपयोगाचे? असे म्हणत राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी आठवडाभरापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महापोर्टल बंद करावे अशी मागणी केली होती. त्यात विद्यार्थ्यांचे महापोर्टल विरोधात निघत असलेले आक्रोश मोर्चा मुळे खासदार सुप्रीया सुळे यांच्या पोर्टल बंदच्या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचलेच पाहिजे ९५ वर्षांचा ‘तरुण’ देतोय व्यायामाचे धडे !
 
हे आहेत पोर्टलवर आरोप
०- आॅनलाईन परीक्षेसाठी प्रामाणित पर्यवेक्षक नसतो.
०- विद्यार्थ्यांच्या गुणदानात भेदभाव
०- उत्तरपत्रिका पडताळण्याची संधी दिली जात नाही.
०- चुकीच्या प्रश्नाला गुण देण्याची पद्धत
०- ठराविक केंद्राची परीक्षा केंद्र म्हणून निवड करणे
०- महापरीक्षा पोर्टलच्या कार्यालयचा पत्ता नसणे.
०- ठराविक विद्यार्थ्यांना हवे तिथे जागा देणे
०- प्रामाणिक आणि दर्जेदार केंद्राची वाणवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT