Money
Money Sakal
मराठवाडा

कुरुंदा येथील 'त्या' खून प्रकरणी माहिती देणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस

संजय बर्दापुरे

सदरील गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे असल्याने प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी वाशीम हाश्मी यांनी वरिष्ठांच्या परवानगीने या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.

वसमत (हिंगोली): वसमत तालुक्यातील कुरुंदा (Kurunda) येथे पाण्याच्या टाकीत दोन मानवी सांगाडे सापडले होते त्यातील पुरुष सांगाडा असलेल्यांचे नाव निष्पन्न झाले होते तर महिला सांगडा असलेल्यांचे नाव निष्पन्न झाले नव्हते. याप्रकरणी सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद व नंतर खुनाचा गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. (Sub divisional police officer has issued a press release saying that a reward of Rs 50 thousand will be given to the person who provides information in the kunda murder case)

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी वसीम हाश्मी यांनी माहिती दिली की, कुरुंदा येथे १४ नोव्हेंबर २०१२ मध्ये जिल्हा परीषद शाळेजवळील पाण्याच्या टाकीत दोन मानवी सांगाडे सापडल्याची घटना उघडकीस आली होती. तपासाअंती एक सांगडा पुरुषाचा असून तो साईनाथ इंगोले (वय २५) यांचा असल्याचे निष्पन्न झाले तर दुसऱ्या सांगड्याबाबत काही निष्पन्न झाले नव्हते. याबाबत कुरुंदा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सदरील गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे असल्याने प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी वाशीम हाश्मी यांनी वरिष्ठांच्या परवानगीने या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणातील एकाचा शोध लागला परंतु दुसरा एक सांगडा २५ ते ३० वर्षीय महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले असून ओळख पटलेली नाही. या प्रकरणी आता गती देण्यासाठी तपासणीस अधिकारी वाशीम हाश्मी यांनी प्रसिद्धी पत्रक काढून या प्रकरणी माहिती देणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस जाहिर केले आहे.

सदरील माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वसीम हश्मी यांनी दिली आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी वसीम हश्मी, कुरूंदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलिस उपनिरीक्षक एस. जी. बोधनकर हे पुढील तपास करत आहेत. (Sub divisional police officer has issued a press release saying that a reward of Rs 50 thousand will be given to the person who provides information in the kunda murder case)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

SRH vs GT : हैदराबाद - गुजरात सामना पाण्यात! काही न करता पॅट कमिन्सचा संघ पोहचला प्ले ऑफमध्ये

SCROLL FOR NEXT