नांदेड : कुठलेही अवयव प्रत्यारोपन करताना त्यात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अलीच, त्यातही अवयव दाता आणि गरजवंत रुग्ण यांच्या रक्तगटात जर तफावत असेलतर, त्या रुग्णावर अवयव प्रत्यारोपन करणे हे गुंतागुंतीचे आणि जिकीरिचे असते. छोट्या शहरात जर अशी शस्त्रक्रिया करावयाची झाल्यास त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम असावी लागते. मात्र, नांदेडमधील ग्लोबल हॉस्पीटलचे संचालक डॉ. त्र्यंबक दापकेकर यांच्या मार्गर्शनाखाली विसंगत रक्तगट असलेल्या व्यक्तीचे अवय काढुन यशस्वीरित्या अवयव प्रत्यारोपन करण्यात आले आहे.
२०१९च्या वर्षाअखेर मंगळवारी (ता.२८) डिसेंबर २०१९ रोजी ग्लोबल हॉस्पिटल नांदेडमध्ये दोन यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्या. यापैकी एक प्रत्यारोपण हे अतिशय आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे होते. सहा वर्षांपूर्वी सागर सदावर्ते यांचे (यकृत) लिव्हर आणि किडनी दोन्ही निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर एकत्रित लिव्हर आणि किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. दरम्यान त्यांचे लिव्हर व्यवस्थितीरित्या कार्य करत होते. मात्र त्यांना किडनी फेल्युअरमुळे २०१९मध्ये डायलिसीस चालू करण्यात आले. दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण आणि त्याहूनही आव्हानात्मक म्हणजे किडनी डोनर हा वेगळ्या रक्तगटाचा असणे. यापूर्वी किडनी विकारतज्ज्ञ डॉ. विजय मैदपवाड यांनी एबीओ (ABO) विसंगत प्रत्यारोपण यशस्वी केले होते. मात्र चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये. नांदेडमध्ये एबीओ (ABO) विसंगत प्रत्यारोपणासाठी रक्तगट विरुद्ध निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीस मोजण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि कला कोणत्याही रक्तपेढीकडे उपलब्ध नव्हती. दत्ताजी भाले ब्लड बँकमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. नंदिनी तिवारी यांनी नांदेडच्या ब्ल्डबँक तंत्रज्ञाला प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली आणि सागर सदावर्ते यांच्या प्रत्यारोपणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
हेही वाचा - ‘या’ कारणामुळे गुदमरतोय ज्येष्ठांचा श्वास
विसंगत रक्तगट तरीही यशस्वी किडनी प्रत्यारोपित
योगायोगाने तो विजायादशमीचा दिवस. जेव्हा डॉ. नंदिनी तिवारी आणि डॉ. विजय मैदपवाड, औरंगाबाद येथे डॉ. गांधी (जसलोक हॉस्पिटल) यांच्या एबीओ (ABO) रक्तगट विसंगत प्रत्यारोपणा संबधीच्या व्याखानानिमित्त भेटले. गुरुगोबिंद सिंघजी ब्लड बँकच्या डॉ. किरण खैराटकर आणि भुवनेश्वर पांचाल यांच्या सहकाऱ्याने आणि डॉ. नंदिनी तिवारी यांच्या प्रशिक्षणाने अँटीबॉडीचे प्रमाण मोजण्यास सुरुवात झाली. सागर सदावर्ते यांचा रक्तगट हा ‘ओ’ निगेटीव्ह तर त्यांची पत्नी सरिता सदावर्ते यांचा रक्तगट ‘ओ’ पॉझिटीव्ह असा असतानही त्यांची किडनी प्रत्यारोपित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यांचे आहे महत्त्वाचे योगदान
शरीरातील अँटीबॉडीचे प्रमाण कमी करण्यासाठी सागर सदावर्ते यांना प्लाज्माफेरेसीस ही प्रक्रिया चार वेळा करावी लागली. अखेर २८ डिसेंबर २०१९ रोजी डॉ. राजीव राठोड, डॉ. शिवराज टेंगसे, डॉ. सोनाली राठोड, डॉ. सुरेखा साजणे डॉ. सतीश राठोड आणि अपोलो चेन्नईच्या तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टीमने प्रत्यारोपणाची शत्रक्रिया पार पाडली. तसेच ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर भेदे, डॉ. अन्वेश जैन, डॉ. शिवकुमार नरवाडे, डॉ. प्रकाश सूर्यवंशी, डॉ. संजय मारकवाड, यांच्यासह ‘आय. सी.यु’ टीम तसेच डॉ. निशांत जोशी, बालाजी पाटील व अवयव प्रत्यारोपण समन्वयक शंकर पोटे यांचे किडनी प्रत्यारोपणात महत्वाचे योगदान लाभले.
हेही वाचाच - ‘हे’ गाव मुलांमध्ये रुजवतेय वारकरी संप्रदायाची बिजे
अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा
सागर सदावर्ते यांची किडनी व्यवस्थित कार्य करत असून, त्यांना लवकरच ग्लोबल हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात येणार आहे. एबीओ (ABO) विसंगत प्रत्यारोपणामध्ये किडनी रिजेक्शन (नकारणे) होण्याची शक्यता जास्त असते ते हाताळण्याची क्षमता आणि तत्परता ग्लोबल हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्सकडे आहे. भविष्यात अधिकाधिक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
- डॉ. त्र्यंबक दापकेकर (व्यवस्थापकीय संचालक, ग्लोबल हॉस्पीटल)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.