File Photo 
मराठवाडा

डॉक्टरांच्या सेवेप्रती असेही ऋण

शिवचरण वावळे

नांदेड : कोरोनाच्या वैश्विक महामारीत देशातील सर्व धर्मियांचे मंदिरे कुलुपबंद आहेत. सध्या देशातील एकमेव देवालय सुरु आहे, ते म्हणजे रुग्णालये. अशा या सेवाधर्म पाळुन सबंध मानव जातीला कोरोनाच्या विषाणुपासून वाचवण्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांना आपण काय देऊ शकतो, या विचारातून एका शेतीव्यवसायिकाने ‘ग्रीनफिल्ड ॲग्रो सर्विसेस ॲण्ड कृष्णा ॲग्रो सर्विसेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी यांच्यासाठी विषमुक्त भाजीपाला देण्याचा कार्य सुरु केले आहे.

‘ग्रीनफिल्ड ॲग्रो सर्विसेस ॲण्ड कृष्णा ॲग्रो सर्विसेस’ यांच्या माध्यमातुन समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्फत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविदयालय विष्णुपुरी येथील डॉक्टर्स, परिचारिका, ब्रदर्स व चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना ४०० हिरव्या फळभाज्यांची कीट मोफत देत आहेत. ज्यामध्ये कांदे, टोमॅटो, आलू , पत्ता कोबी, अद्रक, लसून, कोथिंबीर, लिंबू अशा १८ प्रकारच्या भाजीपाल्यांचा समावेश आहे.   

डॉक्टर्सना भाजीपाल्यांचे किट
परिसरातील शेतकऱ्यांनी पिकविलेला विषमुक्त भाजीपाला जानापुरी (ता.लोहा) येथील ग्रीनफिल्ड ॲग्रो सर्विसेस ॲण्ड कृष्णा ॲग्रो सेल्स यांच्या कलेक्शन सेंटरमध्ये जमा केला जात आहे. ‘कोरोना’ विषाणुपासून बचावासाठी भाजीपाल्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतली जाते. या सेंटरवर भाजीपाल्यांचे किट तयार करून व्यवस्थित पॅकिंग केली जाते. हे सर्व किट सामाजिक बांधिलकी म्हणून समाज कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरसर सर्व कर्मचाऱ्यांना अगदी मोफत दिले जात आहे.  

राष्ट्रीय सेवेत असेही योगदान
हिरव्या भाजीपाल्याचे किट वितरीत करण्यासाठी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय यांची निवड करण्या मागचा उद्देश असा की, पंतप्रधान भारत सरकार व मुख्यमंत्री शासन यांच्या संकल्पनेनुसार या जागतिक महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, परिचारिका, ब्रदर्स व सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आज या राष्ट्रीय सेवेत आपले योगदान देत आहेत. यासाठी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, डॉ. वाय. एच. चव्हाण, उपअधिक्षक डॉ. प्रदीप बोडके, डॉ. शिरीष दुलेवाड आदींचे सहकार्य मिळत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात, २ दुचाकींची धडक; वृद्धासह तरुण-तरुणीचा मृत्यू

Stock Market Today: शेअर बाजारात सेन्सेक्स 400 अंकांनी वर; Mahindra ची तब्बल 10% झेप; पण Adani शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर

Chhatrapati Sambhajinagar: कांदा रडवतोय; बळिराजा दुहेरी संकटात; पैठण तालुक्यातील स्थिती ; मिळतोय मातीमोल दर अन् अवकाळीची टांगती तलवार

Junnar Environment: हिवरेतील १८० वर्षे जुने ‘महोगनी’ धोक्यात; डॉ. गिब्सन यांच्या हस्ते १८० वर्षांपूर्वी रोपण, खोड जाळल्याने वृक्षप्रेमी संतप्त

Latest Marathi News Live Update : विदर्भात सूर्य आग ओकतोय, वर्ध्यात पारा 46 अंशांवर

SCROLL FOR NEXT