फोटो 
मराठवाडा

‘मरासु’ महामंडळाच्या जवानांचे शानदार संचलन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : प्रजासत्ताक दिनी येथील मुख्य शासकिय ध्वजारोहन कार्यक्रमात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांनी परेड (कवायत) मध्ये सहभाग नोंदवून राष्टध्वजाला सलामी दिली. राज्यातील हा पहिला प्रयोग सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त तथा सुरक्षा अधिकारी देविदास ढोले यांच्या प्रयत्नातून पार पडला. त्यांना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी सहकार्य करुन परवानगी दिली. 

राज्यातील अतीमहत्वाच्या ठिकाणी, रुग्णालय, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, विद्यापीठ या आस्थापनेच्या सुरक्षेचा व स्थानिक पोलिसांवरील बंदोबस्तचा भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना एप्रील २०१० मध्ये केली. त्याचाच एक भाग म्हणून नांदेडच्या विष्णुपूरी येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे ५५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात चार अधिकारी, तेरा महिला कर्मचारी आणि उर्वरीत सुरक्षा जवानांचा सहभाग आहे. या जवानांचे प्रमुख देविदास ढोले यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले.

पोलिस विभागाचाच एक भाग

राष्ट्रध्वजाला सलामी कशी द्यायची व परेडमध्ये सहभाग कसा घ्यायचा याचे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण दिल्यानंतर त्यांनी आपल्या महामंडळाचे पोलिस महासंचालक डी. कनकरत्नम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांची भेट घेऊन आपल्या महामंडळाच्या जवानांबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकिय ध्वजारोहन कार्यक्रमास परेडमध्ये सहभागी करून घ्यावे अशी विनंती केली. त्यांची विनंती मान्य करून महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल हा एक पोलिस विभागाचाच भाग असल्याने पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांना आपल्या जवानासह कार्यक्रमाच्या परेडमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली. 

शासकिय रुग्णालयातील सुरक्षेचा भार

या परेडमध्ये सहभागी होता आल्याने सर्व जवानांनी शानदार संचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. या महामंडळाच्या जवानांना अशा या महत्वपूर्ण सोहळ्यात सहभागी होता आले. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून हे जवान शासकिय रुग्णालयातील सुरक्षेचा भार पेलत आहेत. ५५ कर्मचारी हे आळी-पाळीने आपले कर्तव्य बजावत असतात. रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला किंवा डॉक्टरला भेटण्यासाठी हे जवान आत सोडतात. महामंडळाच्या जवांनाचा बंदोबस्त लागल्याने डॉक्टर्सवर होणारे हल्ले व गोरगरीब रुग्णाच्या नातेवाईकांची पाकिटमारी कमी झाल्याचे सुरक्षा अधिकारी देविदास ढोले यांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT