जालना शहरात कोरोना बंदोबस्त पाहणी करताना पोलिस अधीक्षक चैतन्य एस. दुसऱ्या छायाचित्रात विराजसोबत.  
मराठवाडा

त्यांच्या’साठी आता जिल्हाच बनलंय कुटुंब... 

उमेश वाघमारे

जालना -  कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी डॉक्टरांप्रमाणेच पोलिसदेखील कुटुंबापासून दूर होत चोवीस तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे आहेत. या लढ्यात आपला जीव धोक्यात घालून मैदानात उतरलेले आहेत. पोलिस अधीक्षक चैतन्य एस. हेही यास अपवाद नाहीत. सकाळपासूनच बाहेर राहावे लागत असल्याने घरी पंधरा महिन्यांचे त्यांचे बाळ विराज हा त्यांची वाट पाहत असतो. अर्थातच सध्या कुटुंबासोबतच जिल्ह्याचा कोरोनापासून बचाव करायचा विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आता जिल्हाच कुटुंब बनले आहे. 

जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चैतन्य एस. हे नेहमी सर्वसामान्यांना उपलब्ध असतात. सकाळी घरातून ऑफिससाठी बाहेर पडले, की हातावरील संपूर्ण काम संपल्याशिवाय ते घरी जात नाहीत.

अनेकवेळा रात्री उशिरापर्यंत त्यांचे काम सुरू असते. बऱ्याचवेळा दुपारी लंचसाठी देखील घरी जाण्यास वेळ नसतो. त्यामुळे दुपारी घरी वाट पाहणाऱ्या विराजची भेटही आता कमी झाली आहे.

ते रात्री घरी गेल्यानंतर बाहेरच गणवेश काढून ठेवला जातो. त्यानंतर मोबाईलसह त्यांच्याजवळील इतर सर्व वस्तू सॅनिटरायझिंग केल्या जातात. अंघोळ केल्यानंतरच ते चिमुकल्या विराजजवळ जातात. 

रस्त्यावर उतरून काम 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका पोलिस बजावत आहेत. पोलिसांचे प्रमुख असलेले पोलिस अधीक्षक चैतन्य एस. हेही रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी पोलिस अधीक्षक चैतन्य एस. हेदेखील गस्त करीत आहेत. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे पालन करून पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. 

पोलिसांचीही सतत काळजी 

पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून सॅनिटरायझिंगची व्यवस्था, अन्य सुविधांबाबत पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी लक्ष घातले आहे. सध्याच्या काळात पोलिसांचा आहार काय असावा, याबाबत ‘आयुष’ने सुचविलेल्या सल्ल्याच्या पालनाबाबतही ते आग्रही आहेत. त्यांच्या पुढाकाराने पोलिसांसाठी दोन हजार एन-९५ मास्कचे वाटप होत आहे. ट्रिपल लेअरचे सात हजार २०० मास्क वाटप केले जात आहेत. दोन हजार हँडग्लोव्हजचे वाटप करण्यात येत आहे, तसेच प्रत्येकाला सॅनिटायझर वाटप केले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs ZIM : झिम्बाब्वेचा खळबळजनक विजय! ऑस्ट्रेलियाला १९ वर्षानंतर नमवले; सुपर कॅच, भन्नाट गोलंदाजी अन् सुरेख फलंदाजी...

Viral Video : अंगणात फिरणाऱ्या महाकाय अजगरावर बसली मुलगी, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

T20 World Cup: नोकरी सांभाळत स्वप्न जपलं… पिझ्झा विकणाऱ्या कृष्णने वानखेडेवर रचला इतिहास, दोन्ही बाजूंनी चेंडू फिरवण्याची कला

Bhante Surei Sasai Viral Video : भंते ससाई यांनी महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विविध संघटना आक्रमक, अध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी

Kolhapur crime News Today : घरातील पैशांच्या वादातून मुलाकडून वडिलांचा खून; कोल्हापुरातील शाहूवाडीमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT