photo 
मराठवाडा

​तहसीलदारांनी शेकोटीजवळ जागविली रात्र

संजय कापसे

कळमनुरी(जि. हिंगोली): चोरट्या पद्धतीने होत असलेली वाळू वाहतूक रोखण्यासाठी कळमनुरी तहसीलदारांनी सोमवारी (ता. ३०) मध्यरात्रीच्या थंडीच्या कडाक्यात शेकोटी पेटवत अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

तालुक्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्यामुळे सालेगाव, सोडेगाव, नांदापूर, चाफनाथ या ठिकाणांहून चोरट्यापद्धतीने वाळू उपसा करून वाळू विक्री करण्याचा धंदा तेजीत आला आहे. महसूल विभागाकडून या अनधिकृत वाळू उपशाला आळा घालण्यासाठी पथक नेमण्यात आले आहेत. मात्र, या पथकाला गुंगारा देत रात्री-अपरात्री या वाळू घाटांवरून वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांच्याकडे येत होत्या. 

तीन ट्रॅक्टर पथकाच्या जाळ्यात सापडले

त्यानुसार सोमवारी (ता. ३०) रात्री तहसीलदार श्री. वाघमारे, मंडळ अधिकारी आनंदराव सुळे, एस. जे. शिरसाट, गंगाधर पाखरे, पी. एस. पाईकराव, प्रवीण सुरोशे, देवानंद पंचलिंगे यांच्या पथकाने चोरटी वाळू वाहतूक होणाऱ्या सांडस, पुयना मार्गावर पाळत ठेवली. कडाक्याच्या थंडीत मध्यरात्रीपर्यंत हे पथक रस्त्याच्या बाजूला एका शेतात शेकोटी लावून शेकत बसले. मध्यरात्री तीनच्या सुमाराला या मार्गावर चोरटी वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पथकाच्या जाळ्यात सापडले. तिसरे ट्रॅक्टर सोडेगाव येथून कळमनुरीकडे येताना पकडण्यात आले.

तीन लाख ७५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई

 यामध्ये नागेश पवार ट्रॅक्टर (एमएच ३८-२५३०, नितीन मगर (एमएच ३० एबी ५९००), नागेश सातव वाहन क्रमांकाची नोंद नाही. हे तीन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. या ट्रॅक्टरमालकांविरुद्ध तीन लाख ७५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. स्वतः तहसीलदारांनी कडाक्याच्या थंडीत पहाटे पाच वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईत भाग घेत वाळू माफियांविरुद्ध कारवाई केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

वाळू माफियांचे नेटवर्क

चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक करताना वाळू माफियांनी जागोजागी आपली माणसे उभी ठेवत महसूल विभागाच्या पथकावर पाळत ठेवण्या करिता नेटवर्क उभारलेले आहे. यातून कारवाईसाठी महसूलचा अधिकारी, कर्मचारी येत असल्याची खबर सर्वप्रथम वाळूमाफियांना मिळते. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. माफियांच्या नेटवर्कमुळे नदीपात्रातील लाखो रुपयांची वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनालाही वेगवेगळ्या क्लृप्त्या वापराव्या लागत आहेत. दरम्यान, सोमवारी या नेटवर्कला गुंगारा देत तहसीलदारांच्या पथकाने एकाच रात्री वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्‍टरचालकांविरुद्ध कारवाई केल्यामुळे अनधिकृतपणे शहरात दामदुप्पट भावाने वाळूची विक्री करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT