cotton.jpg
cotton.jpg 
मराठवाडा

नांदेड, नायगाव केंद्रावर कापूस न्यावा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोनाशी निगडित विविध विषयांवर तसेच अन्नधान्य वितरणाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कंधार तालुक्यांसह इतर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादीत कापूस विक्रीसाठी येत असलेल्या अडचणीबाबत सविस्तर सूचना दिल्या. कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी नांदेड अथवा नायगाव येथील कापूस संकलन केंद्रावर विक्रीसाठी न्यावा असे सांगितले.

कंधारचा कापूस नांदेड, नायगावला न्यावा
शेतकऱ्यांनी दर्जेदार कापुसच (एफएक्यू) विक्रीसाठी आणावा असे आवाहन केले. कापूस खरेदी केंद्रांना गठाण वाहतूक, सरकी वाहतूक या व इतर अनुषंगिक बाबीसाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल. कापूस खरेदीसाठी संकलन केंद्रानी इतर कुठलीही सबब पुढे करु नये अशा सूचनाही दिल्या. खरीप हंगामातील बहुतांश कापसाची विक्री झाली असून फार तुरळक प्रमाणात वेचणीसाठी व साठवलेला कापूस शिल्लक असून यातील दर्जेदार कापूस संबंधित संकलन केंद्रावर विक्रीसाठी न्यावा. 

व्हीसीला अधिकारी उपस्थित
व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कंधारचे उपविभागीयअधिकारी पांडुरंग बोरगावकर, कंधार तहसिलदार सखाराम मांडवगडे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, सहाय्यक निबंधक जी. आर. कौरवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव पी. डी. वंजे यांच्यासह नायब तहसीलदार विजय चव्हाण, ताडेवाड यांची उपस्थिती होती, अशी माहिती तालुका कृषि अधिकारी रमेश देशमुख यांच्याकडून देण्यात आली. 

कोरोनाविरोधातली लढाई जिंकू
जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस हे संकट अधिकच गडद होत आहे. परंतु भारतात ज्या पद्धतीने आपण लढा देत आहोत, त्या कोरोनाविरोधातली लढाई निश्चितपणे जिंकूच असा आशावाद येथील सामाजिक कार्यकर्ते शहाजी सुनपे यांनी जवळा देशमुख येथे व्यक्त केला. यावेळी मुख्याध्यापक जी. एस.  ढवळे, शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसन गच्चे, सरपंच ग्यानोबा टिमके यांची उपस्थिती होती. 

शालेय पोषण आहाराचे वाटप
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये लाॅकडाऊन काळातील शिल्लक असलेला शालेय पोषण आहाराचा तांदूळ, इतर कडधान्ये वाटप करण्यात यावे असे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आले. त्यानुसार लाॅकडाऊन काळातील धान्य सर्व लाभार्थी विद्यार्थींना वाटप करण्यात आले. शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर यांनी संशयित तथा क्वारोंटाईन व्यक्तींचा संसर्ग टाळणे, साबण किंवा हँडवाॅशने वारंवार हात धुणे, माॅस्क, सॅनिटाईझर यांचा वापर करणे याबाबत मार्गदर्शन केले. 

संचारबंदीचे नियम पाळावेत
मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी या रोगावर अजूनही योग्य औषध निर्माण झाले नसून काळजी घेणे हाच एकमेव उपाय आहे. लाॅकडाऊनमधील संचारबंदीचे नियम काटेकोरपणे पाळावेत तसेच प्रत्येक व्यक्तीने एकमेकांपासून सोशल डिस्टन्स कायम पाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

सोशल डिस्टन्स पाळला
शालेय पोषण आहाराचे धान्य वाटप करताना पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाहीत याची काळजी घेऊन आणि विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सोशल डिस्टन्स पाळला. यासाठी अंकुश शिखरे, आनंद एसपी गोडबोले, पांडुरंग गच्चे, पुंडलिक गच्चे, भानुदास शिखरे, मारोती चक्रधरे, भीमराव गोडबोले, भगवान गोडबोले, मंचकराव पाटील, हैदर शेख, कमलबाई गच्चे यांनी नियोजन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT