covid center covid center
मराठवाडा

तानाजी सावंतांनी उभारले एक हजार खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर

बार्शी येथील जेएसपीएम ग्रुप संचलित भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात एक हजार खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरु केले आहे

तानाजी जाधवर

उस्मानाबाद: आमदार तानाजी सावंत यांनी ग्रामीण भागात कोवीड केअर सेंटर सुरू केले आहे. यामुळे ग्रामीण भागाच्या दृष्टीने चांगली आरोग्य व्यवस्था निर्माण झाल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. बार्शी येथील जेएसपीएम ग्रुप संचलित भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात एक हजार खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटरचे नगर विकास तथा सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते (ता.सात) शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिवसेनेचे सचिव तथा मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार प्रा. तानाजीराव सावंत,आमदार राजेंद्र राऊत, ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री दिलीप सोपल, शिवाजीराव सावंत, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शामलताई वडणे, बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी, भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे, नगरपरिषदेचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, गौतम लटके, प्रशांत चेडे, भूम नगर परिषदेचे संजय गाढवे, बार्शीचे तहसिलदार सुरेश शेरखाने, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, केंद्र समन्वयक विकासरत्न प्रा. तानाजीराव सावंत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री शिंदे म्हणाले की, बार्शी या ठिकाणी शिवसेनेचे आमदार तानाजीराव सावंत यांनी सोलापूर व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सोय करण्यासाठी बार्शी येथे एक हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी बेड मिळत नाहीत या तक्रारी आता कमी होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. कोविड केअर सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असून महिला रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील फार मोठी अडचण दूर झाल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

याठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना रुग्णांच्या रक्ताच्या वेगवेगळ्या आठ चाचण्यासाठी रुग्णांचा खर्चही वाचणार आहे.या सगळ्या सोयीसुविधामुळे तात्काळ निदान होण्यास मदत होणार आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण यामुळे वाढेल असा विश्वास यावेळी मंत्री श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी योगाच्या प्रशिक्षित शिक्षकांची देखील या ठिकाणी टीम कार्यान्वित करण्यात आलेली आहे.हे सेंटर नैसर्गिक व मोकळ्या वातावरणात असल्याने रुग्ण लवकर बरा होऊन घरी जाण्यासाठी फायदा होणार आहे.आमदार ‌सावंत यांनी अशा प्रकारची व्यवस्था करून शासनाला हातभार लावण्याबरोबरच रुग्णांना खरोखरच आरोग्यदायी दिलासा दिल्याचे गौरवोद्घागार श्री. शिंदे यांनी काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT