फोटो 
मराठवाडा

सहावीतील मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका शिक्षकाला अटक 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शंकरनगर (ता. नायगाव) येथील दोन शिक्षकांनी सहावीत शिक्षण घेणाऱ्या आपल्याच विद्यार्थीनीवर पाशवी बलात्कार केला. ही घटना माणुसकीला व शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घडली. जिल्हाभर संतापाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान बुधवारी (ता. २२) दुपारी युवा पॅंथरच्या वतीने या प्रकरणी पोलिस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले.

शंकरनगर (ता. नायगाव) येथील श्री साईबाबा विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका सहावीतील मुलीला सांस्कृतीक कार्यक्रमाचे फोटो दाखवतो म्हणून शाळेतील एका खोलीत नेऊन तिच्यावर दोन नराधम शिक्षकांनी पाशवी बलात्कार केला. घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून या घटनेतील नराधम शिक्षक सय्यद रसुल आणि दयानंद राजूळे यांच्यासह मुख्याध्यापक प्रदीप पाटील, प्राचार्य धनंजय शेळके आणि एका महिलेविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. परंतु अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या सापळ्यात अडकला नव्हता.

बोंढार (ता. नांदेड) शिवारातून सय्यद रसुलला ताब्यात 

जिल्हाभर या घटनेचे पडसाद उमटत असतांना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी स्वत: आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ, बालाजी हिंगनकर, श्री. केंद्रे, बाबर आणि श्रीरामे यांना सोबत घेऊन गुप्त माहितीवरून बोंढार (ता. नांदेड) शिवार गाठले. मिळालेल्या माहितीवरून या पथकाने सय्यद रसुल महेबुब याला ताब्यात घेतले. दुसरा आरोपीही पोलिसांच्या रडारवर असून रात्री उशिरापर्यंत त्यालाही ताब्यात घेण्याची शक्यता वर्तविल्या जाते. 

युवा पॅँथरचे राहूल प्रधान यांचा पुढाकार

या घटनेच्या पार्श्‍वूमीवर युवा पॅँथरचे राहूल प्रधान यांनी आपल्या सहाकाऱ्यांसह पोलिस अधिक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखल्यानंतर पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. श्री साईबाबा विद्यालयाच्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल करा, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांना निलंबीत करून त्यांच्यावरही कारवाई करा, खासगी रुग्णालयात पिडीतेवर पोलिसांना न कळवता उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करा, पीडीत बालिकेच्या आईचे म्हणणे पुन्हा नोंदवून घ्या यासह आदी मगण्या त्यांनी केल्या आहेत. यावेळी ॲड. अविनाश भोसीकर, दिनेश लोणे, शाम कांबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 

तपास महिला पोलिस उपाधिक्षकांकडे

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी अहमदपूर (जिल्हा लातूर) येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. तसेच एपीआय सोमनाथ शिंदे यांच्याबद्दल वरिष्ठांच्या अहवालावरून कारवाई करण्यात येईल असा विश्‍वास प्रभारी पोलिस अधिक्षक विजय पवार यांनी युवा पॅँथर्सच्या पदाधिकाऱ्यांना दिला.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Mumbai Rain Update : मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीवर पावसाचं सावट! हवामान खात्याने दिली महत्त्वाची अपडेट, पहाटेपासून शहरात ढगाळ वातावरण

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

Latest Maharashtra News Updates : लालबागच्या राजाची आरती संपन्न

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT