tehsildar Aditya Jivane action two illegal sand transporters beed sakal
मराठवाडा

Beed News : तहसीलदारपदी बसताच आदित्य जीवनेंनी पकडले वाळूचे दोन हायवा

पहिल्याच दिवशी कारवाई करून अवैध वाळू वाहतूक व उपसा करणाऱ्यांवर जरब बसविली

सकाळ वृत्तसेवा

बीड : परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने यांनी सोमवारी (ता. १२) बीडचे तहसीलदार म्हणून पदभार घेतला. प्रभारी तहसीलदार सुहास हजारे यांच्याकडून पदभार स्वीकारून दिवसभर माहिती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी श्री. जीवने यांनी रात्री माळापुरी येथे अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा पकडले.

माजलगाव, गेवराई व बीड तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा मुद्दा कायम चर्चेत असतो. श्री. जीवने यांनी पदावर बसताच पहिल्याच दिवशी कारवाई करून अवैध वाळू वाहतूक व उपसा करणाऱ्यांवर जरब बसविली.

भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आदित्य जीवने सप्टेंबर २०२२ मध्ये परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून जिल्हा प्रशासनात शासनात रुजू झाले. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या पुढाकाराने हाती घेतलेल्या बिंदुसरा नदी स्वच्छता मोहिमेत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी त्यांनी माजलगावचे मुख्याधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर त्यांनी अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे राबविली. याचे सामान्यांमध्ये मोठे स्वागत झाले. दरम्यान, महिनाभरापूर्वी त्यांनी बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यात सर्वाधिक विहीर पुनर्भरणाचे कामे बीड तालुक्यात हाती घेतले.

तसेच त्यांच्या संकल्पनेतून ६५ अंगणवाड्यांमध्ये परसबाग लागवडीची कामेही हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान, सोमवार (ता. १२) पासून त्यांनी बीडचे तहसीलदार म्हणून पदभार घेतला.पहिल्या दिवशी प्रशासकीय कामे करत कार्यालयीन माहिती घेतली.

त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता त्यांनी आपला मोर्चा अवैध वाळू उपसा व वाहतुकीकडे वळविला. माळापुरी येथे एक हवा थांबवण्यात आला. सदर हायवाची पाहणी केली असता त्यामध्ये वाळू असल्याचे निदर्शनास आले.

चालक कृष्णा कांबळे यांना वाळू वाहतूक परवानाबाबत चौकशी केली असता परवाना नसल्याचे तसेच हायवावर क्रमांक नसल्याने हा हायवा पकडून जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आला. तर, पुन्हा रात्री एक वाजता पेंडगाव येथे एक हायवा (एमएच- ०६ ः बीडी - ९८७७) पकडण्यात आला. त्यांच्या समवेत प्रभारी तहसीलदार सुहास हजारे, मंडळ अधिकारी अंगद काशीद होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

Plane Service : मोठी बातमी! सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबरपासून होणार सुरू; 'डीजीसीए'कडून स्टार एअरला परवानगी

NCP News: सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात, रोहित पवार भडकले, काय म्हणाले?

Beed News: सरकारी वकिलाचं टोकाचं पाऊल, कुटुंबाच्या मागणीने मोठा ट्विस्ट, बीड हादरलं..

Pune News : ठेकेदारावर पीएमपीने कारवाई केली, महापालिका कधी करणार? मनसेचा महापालिकेला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT