nal
nal 
मराठवाडा

या’ कारणांमुळे होऊ शकते परभणीत पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा

परभणी : शहराचा निम्मा भाग पूर्णतः हातपंप व बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून असून जमिनीतील पाणीपातळी खालावली जात असल्यामुळे या भागाला येत्या काही दिवसांत पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू शकते. नवीन वितरण व्यवस्था झालेली असताना नळ जोडणी न घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्‍भवण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेमध्ये या भागातील नागरिकांना सद्यःस्थितीत मालमत्ता कर भरण्याची अट शिथिल केली असून त्यामुळे तरी नळजोडणी पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.

महापालिकेच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेतून शहराच्या निम्म्या भागातच पाणीपुरवठा होतो, तर उर्वरित भागाला पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, आता गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेची नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. 

बहुतांश नळ जोडण्या जुन्याच भागात
वितरण व्यवस्थेवर नळजोडण्याची कामेदेखील सुरू झालेली आहेत. परंतु, नळजोडणीला गती आलेली नाही. किमान ५० हजार नळजोडण्या देणे अपेक्षित असताना केवळ पंधरा-वीस नळजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. त्यातही बहुतांश जोडण्या जुन्याच भागात झालेल्या दिसून येतात. नवीन भागातील नागरिकांनी अद्याप नळजोडण्या घेतलेल्या नाहीत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच जमिनीतील पाणी पातळी खालावत असल्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्याचे संकट येण्याची दाट शक्यता आहे.

नवीन भागाला कर सवलत
ज्या भागात कुठलीच पाणीपुरवठा योजना कार्यरत नाही, अशा भागातील नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर भरण्यासाठी सवलत दिलेली आहे. या नव्या भागातील नागरिकांना आता नळजोडणी घ्यावयाची असल्यास थकीत मालमत्ता कर सद्यःस्थितीत भरावा लागणार नाही. त्यांना केवळ नळजोडणीचे आवश्यक शुल्क भरावे लागेल, असे महापालिकेनेदेखील स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आतातरी या भागातील नागरिक नळजोडणी घेतील व आपल्यावर येणारे पाणी संकट दूर करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरिकांनी नळजोडण्या घ्याव्यात
महापालिका टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार नाही. परंतु, नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागू नये म्हणून सद्यःस्थितीत मालमत्ता कराची थकबाकी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू नये म्हणून नागरिकांनी नळजोडण्या घ्याव्यात, ही अपेक्षा आहे.
रमेश पवार, आयुक्त, महापालिका परभणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT