Nanded News 
मराठवाडा

‘यांना’ सापडला भक्तितून आनंदाचा मार्ग

प्रमोद चौधरी

नांदेड : बदलत्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकजणच आनंदाचा शोध घेत आहे. कुणी संगीतमध्ये आनंद शोधतो, कुणी छंद जोपासून आपला आनंद द्विगुणीत करतात, तर काहीजण भक्तीच्या माध्यमातून आनंद शोधतात. भक्तीची साधना केल्यावर जो आनंद मिळतो, तो कुठेच मिळत नाही. हे सिद्ध केले आहे नवीन नांदेडातील भाविकांनी. त्यांनी नियमिती भजन-गायनातून आनंदाचा मार्ग तर शोधलाच आहे; शिवाय समाजातही एकतेचा संदेश ते देत आहेत.


नांदेड शहरापासून सुमारे १२ ते १४ किलोमिटर अंतरावर नवीन नांदेड वसाहत आहे. औद्योगिक परिसरामुळे या भागाचा विस्तार झपाट्याने वाढला आहे. नागरी वसाहतीही मोठ्या प्रमाणावर आहेत. या परिसरातील नागरिकांना भक्तिमार्गातून आनंद मिळावा, नामजपातून मन प्रसन्न व्हावे, या हेतूने सिडकोने संभाजी चौक येथे गजानन महाराजांचे मंदिर उभारण्यासाठी भूखंड दिला आहे. त्या जागेवर १९८५ मध्ये दिवंगत गोपीनाथराव हत्ते यांनी गजानन महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सद्यस्थितीत लोकवर्गणीतून मंदिराच्या गाभाऱ्यात ग्रेनाईटचे काम पूर्ण झालेले आहे.


एकतेचाही देतात संदेश
औद्योगिक वसाहतीमुळे या भागात ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या शोधात स्थायिक झालेले आहेत. यातील बहुतांश जणांना भक्तीची आवड आहे. या भक्तितूनच १९९३मध्ये काळा हनुमान भजन मंडळाची स्थापना झालेली आहे. तेव्हापासून आजपर्यतं गजानन महाराज मंदिरात मंडळातील सदस्य प्रत्येक गुरुवारी, एकादशीला नियमित भजन करतात. स्वतःसोबतच इतरांनाही आपल्या मंडळामध्ये सामावून घेत एकतेचाही संदेश समाजामध्ये देत आहेत.

 

असे होतात कार्यक्रम
भजनी मंडळामार्फत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त भव्य मिरवणूक सिडको परिसरामध्ये काढली जाते. तसेच भावार्थ रामायण, लक्ष्मणशक्ती आदी कार्यक्रमही होतात. कृष्ण जन्माष्टमी, कोजागिरी, तुकाराम बीज, आषाढी व कार्तिकी एकादशीला सदस्यांशिवाय परिसरातील नागरिकही भजन-गायनामध्ये दंग होतात, हे मंडळाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. एवढेच नाहीतर निमंत्रणानुसा मंडळातील सदस्य घरोघरी जावूनही भजनाचे कार्यक्रम सादर करतात.

यांचा आहे समावेश
काळा हनुमान भजन मंडळातील सदस्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या मंडळात उमाकांत जाधव, मनोहर लांडगू, अर्जून रामकिसन गुंडाळे (तबला), नागोराव देशमुख, शंकर कापशीकर (हार्मोनिअम), बालाजी नळगे, आर. जी. लखेकर, विश्‍वनाथ खरात, दत्तात्रय आंबेकर, शिवाजी कुलुलवाड, विठ्ठल कहाळेकर, देवानंद गिरी, प्रकाश कुलकर्णी, अरुण कुलकर्णी (मंदिरातील पुजारी), सचिन जाधव आदींचा समावेश आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT