Sillod Crime News  
मराठवाडा

खुन केला अन् चार लाख लुटले, चौघांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड  (जि.औरंगाबाद ) : येथील वॉईन शॉपवरील काम करणाऱ्याचा खुन  करून चार लाख रूपयांची लुट केल्याप्रकरणी बुधवारी (ता.19) अटक करण्यात आलेले संशयित आरोपी अजय गुलाबराव रगडे (वय 30, रा. सातारा परिसर, औरंगाबाद), चेतन अशोक गायकवाड (वय 34, रा. शिक्षक कॉलनी, सिल्लोड), संदीप आसाराम गायकवाड (वय 26, रा. कैकाडी गल्ली, परतूर) यांना गुरुवारी (ता. 19) सिल्लोड शहर पोलिसांनी दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयात हजर केले.

सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी राजेंद्र बोकडे यांनी न्यायालयास विनंती केली की, आरोपींनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करायचे आहे. ज्या शर्टाचे बटन मिळाले त्यासंबंधी पुरावे गोळा करणे बाकी आहे. घटनास्थळावरून चप्पल जप्त केलेली आहे. याबाबतचे पुरावेही गोळा करायचे आहेत. त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

यावर न्यायाधीश आर.पी.थोरे यांनी आरोपींना रविवारपर्यत चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींचे मागील पोलिस रेकॉर्ड व घटना गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.


शहरातील प्रियदर्शनी चौकात असलेल्या एका वॉईन शॉपवर कामावर असलेले कर्मचारी भिकन निळुबा जाधव (वय 48, रा. मोढा, ता. सिल्लोड) तसेच त्यांचा साथीदार लक्ष्मण पुंजाजी मोरे हे ता. 12 मे 2019 रोजी दुकान बंद करून रोख रक्कम घेऊन जयभवानीनगर येथील घरी जात होते. रात्री साडेदहाच्या दरम्यान भराडी रस्त्यावरील जयभवानीनगर परिसरामध्ये
आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करून रोख रक्कम घेऊन ते पसार झाले होते.
घटनेमध्ये भिकन जाधव यांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Loan EMI Tips: कर्ज लवकर फेडण्यासाठी या 4 स्मार्ट टिप्स फॉलो करा! नवीन लोन घेताना 'या' 10 चुका अजिबात करू नका

Women Health: महिलांना चाळीशीनंतर सतत लघवीला का जावं लागतं? डॉक्टरांनी सांगितली त्यामागची खरी कारणं

Latest Marathi News Live Update : प्रियांका गांधींनी कुंभार समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले

Raigad Entrepreneurs Honoured: रायगडचा मान उंचावला; ‘नेक्स्टजेन डिजिटल’चे श्रीकांत जाधव व ‘अलोरवेदा’च्या पूजा खेडेकर यांना राष्ट्रीय ‘एमएसएमई स्टार पुरस्कार २०२६’

SCROLL FOR NEXT