file photo 
मराठवाडा

‘त्या’ ३२ शिक्षकांना जावे लागणार ...कोठे ते वाचा...

नवनाथ येवले

नांदेड : मर्जीतल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन शिक्षण संस्थेला फेरमान्यता मिळवली. नव्याने पदनिर्माण करत शिक्षकांना बोगस मान्यता प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या फिर्यादीवरुन संस्थेच्या संचालक मंडळाविरूद्ध रामतिर्थ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिस तपास पथकाने संस्था सचिवास लातूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पोलिस अटक केली. शिक्षण संस्थेच्या चार शाळेतील ३२ शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्याने  शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करण्याच्या उद्देशाने शिक्षण संचालक पुणे कार्यालयाकडून परिसरातील शाळांची माहिती मागविण्यात आली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक शाळा (बिजुर), सत्यसाईबाबा प्राथमिक शाळा (बिलोली), अशोक प्राथमिक शाळा (कुंडलवाडी), त्रिशाला प्राथमिक शाळा (दत्तनगर, नांदेड) या शाळांना पुर्नमान्यता मिळवून नव्याने पद निर्माण करण्यात आले. दरम्यान, पटपडताळणीद्वारे संस्थेची मान्यता रद्द झाल्यानंतर मर्जीतल्यांना हाताशी धरून लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांना संस्थेच्या संचालक मंडळाने फेरमान्यता मिळवली. जिल्हा प्रशासनासह शासनस्तरावर खोटा पत्रव्यवहाराचाही संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला. पत्रव्यवहाराद्वारे सचिव विक्रम राचुरे यांनी प्रशासनाची दिशाभूल करत ३२ शिक्षकांच्या मान्यता मिळविल्या. 

रामतिर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा
संस्थेतील शिक्षकांच्या तक्रारीवरुन नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून शिक्षकांच्या बोगस मान्यतेचे प्रकरण समोर आले. लोकशिक्षण संस्थेस पुर्नमान्यता मिळवून संस्थेच्या चारही शाळामध्ये बोगस पद निर्माण करत शिक्षकांना बोगस मान्यता प्रकरणी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर यांच्या फिर्यादीवरुन रामतीर्थ पोलिस ठाण्यात संस्थेच्या संचालक मंडळाविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपीच्या अटकेसाठी बोगस मान्यता प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला. संस्थेचे सचिव विक्रम राचुरे यांना तपासी अधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर येथून अटक केली. सचिव राचुरे यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

इतर शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन  
लोकशिक्षण संस्थेच्या शाळेतील एकूण ३२ शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालक पुणे कार्यालयाकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून माहिती मागविण्यात आली आहे. संस्थेच्या बिजूर प्राथमिक शाळा (बिजूर), सत्यसाईबाबा प्राथमिक शाळा (बिलोली), अशोक प्राथमिक शाळा (कुंडलवाडी), त्रिशाला देवी प्राथमिक शाळा (दत्तनगर, नांदेड) या शाळेच्या परिसरातील इतर शाळेत विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी शिणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी विद्यार्थी पटसंख्येसह परिसरातील शाळांची माहिती शिक्षण संचालक कार्यालयास पाठवली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

Pune Kolhapur Highway Traffic : गणेशोत्सवाच्या गर्दीने खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; पाच तासांचा प्रवास दहा तासांवर

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! सांगलीतील ४ हजार ९९ लाभार्थ्यांची दुसरी कर्जमाफी यादी प्रसिद्ध

Marathi News Live Updates : जांभूळवाडी दरी पुलावर मध्यरात्री भीषण अपघात; चारचाकीचा चक्काचूर, ट्रक पलटी

SCROLL FOR NEXT