Parbhani Accident News
Parbhani Accident News esakal
मराठवाडा

खड्डा चुकविण्याचा नादात घडला भीषण अपघात, तिघा भावंडांचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जिंतूर (जि.परभणी) : जिंतूर शहरापासून तीन किमीच्या अंतरावर असलेल्या अकोली शिवारातील रस्त्यावर खड्डा चुकविण्याचा नादात दुचाकी व ट्रकची झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावासह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदय हेलवणारी घटना सोमवार (ता.२४) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृत तिन्ही भावंडे मालेगाव येथील रहिवासी असल्यामुळे (Parbhani) समस्त ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. सदरील भीषण अपघाताविषयी सविस्तर वृत्त असे, की जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला १८ वर्षीय अभिषेक काशीनाथ म्हेत्रे हा आपल्या १५ वर्षीय योगेश काशीनाथ म्हेत्रे या सख्ख्या भावाला शहरातील जवाहर विद्यालयात सोडण्याकरिता व २० वर्षीय रामप्रसाद विश्वनाथ या चुलत भावाला कामावर सोडण्यासाठी दुचाकीवर (एमएच २६ ए व्ही २८३४) जिंतूरच्या दिशेने निघाला होता.(Three Brothers Died In Accident Near Jintur Of Parbhani)

अकोली शिवारातील पुलाजवळ खड्डा चुकविण्याचा नादात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकवर (एमएच १८ बीजी ६२७०) तिघे जण जोरात आदळल्याने ट्रकने तिघांना चेंगरत नेले. सदरील भीषण अपघातात दोन सख्ख्या भावंडांसह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोफने, पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड, पोलिस काँन्स्टेबल गायकवाड आदींच्या पथकाने मालेगाव ग्रामस्थ नागरिक पांडुरंग मुसळे, तुकाराम थिटे, ज्ञानेश्वर पांचाळ, सामाजिक कार्यकर्ता नागेश आकात व रुग्णवाहिका चालक अरूण घुगे यांच्या मदतीने मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. एकाच कुटुंबातील दोन सख्खे व एक चुलत भावंडांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याने मालेगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

रस्त्यावर चार वर्षात ४६ कोटी खर्च

जिंतूर (Jintur) -देवगाव फाटा रस्ता दुरुस्तीसाठी मागील चार वर्षात तब्बल ४५.९० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र सासरे, जावई कंत्राटदारांनी दोनदा रस्त्याचे थातूरमातूर काम केल्याने आजघडीला रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे व नियमबाह्य गतिरोधक असल्याने सदरील रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खड्डे आणि गतिरोधक दिवसेंदिवस धोकादायक बनत असल्यामुळे अनेकजण मृत्युमुखी पडत असल्याचे उदाहरण सर्वश्रुत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT