Latur News esakal
मराठवाडा

बंधाऱ्यात बुडून ३ मुलांचा मृत्यू, लग्नाच्या दिवशी कुंटूबावर दुःखाचा डोंगर

लग्नाच्या दिवशी कुंटूबावर दुःखाचा डोंगर

शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर) : लाळी खूर्द (ता.जळकोट) येथे एका लग्न समारंभासाठी आलेल्या तीन मुलांचा कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडाल्याने अंत झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवारी (ता.२७) सकाळी घडली आहे. सकाळी एकीकडे लग्न समारंभाची जोरदार तयारी सुरू होती. जमलेल्या पाहुण्या रावळ्यांमुळे तेलंगे परिवारात आनंदाचे वातावरण होते. पण या दुर्दैवी घटनेमुळे एका क्षणात ते दु:खामध्ये रुपांतरीत झाले. या घटनेने सबंध जळकोट (Jalkot) तालुका हादरला आहे. (Three Children Drowned In Barrages In Jalkot Taluka Of Latur)

लातूर (Latur) जिल्ह्यातील लाळी खुर्द येथील तुळशीराम तेलंगे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज गावातच आयोजित करण्यात आला होता. घरी पाहुण्यांची मोठी गर्दी असल्याने आंघोळीसाठी म्हणून बाहेरगावाहून आलेली पाहुणे मंडळींतील काही मुले लाळी खूर्द येथे तिरु नदीवर असलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्यावर गेली होती. दोन मुले पोहोण्यासाठी बंधाऱ्यात उतरली. त्याचवेळी त्यांनी अन्य एका मुलास बंधाऱ्यात येण्यास सांगितले आणि येथेच घात झाला. ज्याला पोहोता येत नव्हते.

त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तीन मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. एकनाथ हाणमंत तेलंगे (वय १५, रा. उदगीर), चिमा बंडू तेलंगे (१६), संगमेश्वर बंडू तेलंगे (१४, दोघेही रा.चिमेगाव, ता.कमालनगर, जि. बिदर) या तीन अल्पवयीन व शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police Raid : मुंबई-पुण्यातून आणल्या जायच्या महिला; व्हॉट्सॲप ग्रुप करून वाशीतील लॉजमध्ये सुरू होता वेश्‍याव्यवसाय, हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

Smartphone Survey: स्क्रीन फुटली,फोन बदलला! ५३% भारतीयांनी खरेदी केला नवीन फोन!

iPhone मध्ये लपलेत 'हे' 5 सिक्रेट फीचर्स, 90% भारतीयांना माहितीच नाहीत

Latest Marathi News Live Update : तुकाराम मुंढेंना पांडुरंगाच्या महापूजेचा मान मिळावा; सत्यशोधक वारकरी महासंघाची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

Solapur: गौडगाव (बु) येथे विदयार्थ्यांना वॉटर बॉटल, वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण, १०० वृक्षांचे वृक्षारोपण

SCROLL FOR NEXT