Latur News 
मराठवाडा

लातूरकरांच्या सेवेत तीन नव्या सिटी बस रुजू 

सकाळ वृत्तसेवा

लातूर : लातूरकरांना शहरांतर्गत प्रवास सुखकर व्हावा, यासाठी तीन नव्या सिटी बस शुक्रवारी लातूरकरांच्या सेवेत रुजू करण्यात आल्या. यापूर्वीच्या 10 आणि आता नव्याने रुजू झालेल्या 3 अशा एकूण 13 सिटी बसच्या माध्यमातून लातूरकरांना आता शहरातून प्रवास करता येणार आहे. या सिटी बसच्या लोकार्पणस्थळी पोहोचण्यापूर्वी महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी स्वतः सिटी बसमधून प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 

लातूर शहराचा विस्तार वेगाने होत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून लातूर शहरात अंतर्गत प्रवास कठीण होत असताना शहरातील नागरिकांना सुविधा देण्याचे काम महापालिका करीत आहे. शहरातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी काही वर्षांपूर्वी शहर बससेवा सुरू करण्यात आली. नागरिकांची मागणी आणि या सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहता बसची संख्या वाढविण्यात आली. शहराची गरज पाहता एकूण 22 बस सेवेत दाखल होणार आहेत. त्यापैकी तीन नव्या बस शुक्रवारपासून लातूरच्या रस्त्यावर आल्या. 

महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी या तीन बसचे लोकार्पण केले. या सिटी बसचे लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमास जाताना महापौर आणि उपमहापौर यांनी स्वतः सिटी बसमधूनच प्रवास केला. प्रवासादरम्यान प्रवाशांशी चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आणखी काय सुधारणा करता येतील याबाबत सूचना ऐकून घेतल्या. बस कुठे थांबतात, प्रवाशांना योग्य त्या ठिकाणी उतरविले जाते काय? बसमध्ये क्षमतेप्रमाणे प्रवासी संख्या असते काय? याचीही माहिती महापौर व उपमहापौर यांनी घेतली.

तीन नव्या बस रुजू झाल्याने शहराअंतर्गत प्रवासाची सोय अधिक चांगली होणार आहे. नव्या मार्गावर सिटी बससेवा सुरू करता येणार असून शहराच्या विविध भागांतील नागरिकांना परवडणाऱ्या दरात या माध्यमातून प्रवास करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती, ऍड. शैलेश गोजमगुंडे, मंगेश बिराजदार, गुरुनाथ मगे, युनूस मोमीन, सुनील मलवाड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar on Parth Pawar land deal case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अखेर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

TET Exam 2025: टीईटी संदर्भात शिक्षक परिषदेचे महत्वाचे आवाहन;...तर नुकसानीस उमेदवार जबाबदार राहतील

Pune Protest : 'टीईटी' च्या सक्तीविरोधात शिक्षक संघटनांची वज्रमूठ; २४ नोव्हेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्याचा निर्णय!

Hybrid learning in MBA : एमबीए आणि पीजीडीएममधील हायब्रिड शिक्षण मॉडेल्सचा उदय: संधी आणि आव्हाने

Elon Musk : फडणवीसांनी घडवला इतिहास! Starlink चं इंटरनेट सगळ्यांत पहिलं महाराष्ट्रात.. इलॉन मस्कच्या कंपनीसोबत झाला करार

SCROLL FOR NEXT