Latur Corona Updates, Latur
Latur Corona Updates, Latur 
मराठवाडा

Latur Breaking : लातुरात एक, तर औशात दोघांना कोरोनाची लागण

हरि तुगावकर

लातूर ः लातूर जिल्हयात आतापर्यंत शंभर रुग्णांनी कोरोनावर मात केली असतानाच शुक्रवारी (ता.पाच) जिल्ह्यात आणखी तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात लातूर शहरातील एक व औशातील दोघांचा समावेश आहे. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत शुक्रवारी (ता.पाच) जिल्ह्यातील एकूण ५४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २० व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी १९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

हा व्यक्ती नरहर कुरुंदकर मार्ग भाग्य नगर येथील रहिवासी असून त्यांना ताप, खोकला व दम लागत असून त्यांना शुगरचा आजार आहे. हा रुग्ण गुरुवारी (ता.चार) सांगली येथून प्रवास करून आलेला आहे, अशी माहिती कोरोना विलगीकारण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयातून आलेले दोन पैकी दोन, रेणापूर येथील नऊ पैकी नऊ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. औसा येथील २३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी २१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.विजय चिंचोलकर यांनी दिली.


दरम्यान लातूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता.पाच) कोरोना बाधित सहा रुग्णांना रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या शंभर झाली आहे. शुक्रवारी निलंगा तालुक्यातील दापका कोविड केअर सेंटरमधून कासारशिरशीचे पाच रुग्ण व शिराढोणचा एक रुग्ण असे एकूण सहा रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या ४१ रुग्णावर उपचार सुरु आहेत.

कोरोना मिटर
एकूण बाधित - १४५
उपचार सुरु असलेले - ४१
बरे झालेले - १००
मृत्यू - ४

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT