CoronaVirus
CoronaVirus 
मराठवाडा

CoronaNews: लातूरातील डॉक्टरला कोरोनाची लागण, दिवसभरात तीन पॉझिटिव्ह

सुशांत सांगवे

लातूर : कोरोनाशी लढणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांपाठोपाठ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांना आता कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची लातूरातील ही पहिलीच घटना आहे. त्यांच्यासह तीघांचा अहवाल बुधवारी (ता. २४) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे लातूरातील चिंतेचे वातावरण वाढले आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्ह्यातील एकूण 69 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी आले होते. त्यापैकी 58 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील भूलतज्ञ असलेल्या डॉक्टरांचा समावेश आहे. ते मुंबईवरून प्रवास करून आले आहेत. उर्वरित 7 व्यक्तींचे अहवाल अंतिम आले नाहीत, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

लातूरात दिवसेंदिवस वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लातूरकरांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यातच तब्बल १६ जण कोरोनाला हरवून आज (ता. २४) रुग्णालयातून बाहेर पडले आहेत, विशेष म्हणजे, यात सहा वर्षांच्या मुलाचा आणि ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी जाहीर केली.

यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ५, उदगीरमधील ६, लातूरमधील कोविड केअर सेंटरमधील ३ आणि निलंगा येथील कोविड केअर सेंटरमधील दोघांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेले उदगीरमधील सहाजण हे हनुमान नगर भागातील आहेत. लातूरमधील कोविड केअर सेंटरमधील तीनपैकी दोनजण क्रांती नगरमधील तर एक चौधरी नगर भागातील आहे.

लातूरमधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील पाचपैकी दोनजण उदगीर येथील, सराफ लाईन भागातील एक, भुसार लाईन भागातील २, निलंगा तालूक्यातील हिप्परगा भागातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सध्या ६२ झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची १७४ झाली आहे. आजवर उपचारादरम्यान १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

असा आहे कोरोना मीटर
एकूण बाधीत : २४९
सध्या उपचार घेत असलेले : ६२
बरे झालेले : १७४
मृत्यू : १३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT