file photo 
मराठवाडा

नांदेडला कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील तीनजण क्वारंटाइन

अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेडला शहरात अबचलनगर येथे सापडलेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील तीन जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर ११ जणांना होम क्वारंटाइन आले आहे. दरम्यान, शहरातील अबचलनगर आणि पीरबुऱ्हाणनगर या दोन कंटेनमेंट झोनमध्ये मंगळवारी २० हजार जणांची तपासणी करण्यात आली आहे. 

नांदेड शहरातील पीरबुऱ्हाणनगर येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा सहा दिवसांच्या उपचारानंतर तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. पीरबुऱ्हाणनगर कंटेनमेंट झोनमध्ये आज सातव्या दिवशी मंगळवारी (ता. २८) चार हजार १५९ घरांतील १७ हजार ९९६ व अबचलनगर कंटेनमेंट झोनमध्ये ४६७ घरातील एक हजार ८६० व्यक्तींची आरोग्य विभागामार्फत ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणाबाबत थर्मल मशीनने तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या या नागरिकांना वरीलपैकी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आली नाहीत.

कंटेनमेंट झोनकडे विशेष लक्ष
महापालिका क्षेत्रातील अबचलनगर येथील एका ४४ वर्षीय नागरिकाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे सोमवारी (ता. २७) अबचलनगर व लगतचा परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करून सील करण्यात आला आहे. आरोग्य विभागातर्फे अबचलनगर येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील तीन व्यक्तींना एनआरआय निवास येथे क्वारंनटाइन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील अकरा व्यक्तींना होम क्वारंनटाइन करण्यात आले आहे.

महापालिकेकडून स्वच्छता
दरम्यान, महापालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे या भागात स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाची पथकेही विशेष लक्ष देत आहेत. महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अजितपालसिंघ संधू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन व त्यांचे आरोग्य पथक हे अबचलनगर व पीरबुऱ्हाणनगर कंटेनमेंट झोनवर लक्ष ठेवून आहेत.

६२ नमुने तपासणी अहवाल बाकी
कोरोनाच्या संसर्गाबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
(मंगळवार, ता. २८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत)

  • - एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - दोन
  • - आतापर्यंत एकूण क्वारंनटाइन - ९८५
  • - क्वारंनटाइन कालावधी पूर्ण - २८५
  • - अजून निरीक्षणाखाली असलेले - ८१
  • - त्यापैकी दवाखान्यात क्वारंनटाइनमध्ये - १०८
  • - घरीच क्वारंनाटाइनमध्ये असलेले - ८७७
  • - आज मंगळवारी तपासणीसाठी नमुने घेतले - ६२
  • - एकूण नमुने तपासणी - ७९९
  • - त्यापैकी निगेटिव्ह - ७२९
  • - नमुने तपासणी अहवाल बाकी - ६२
  • - नाकारण्यात आलेले नमुने - पाच
  • - जिल्‍ह्यातील बाहेरून आलेले एकूण प्रवासी ८२ हजार २७१ असून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आल्याची माहिती नांदेडच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT