Parbhani Accident News esakal
मराठवाडा

Parbhani Accident | जिंतूर-औंढा महामार्गावर अपघात, तीन जण जखमी

जिंतूर-औंढा महामार्गावर अपघात

राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जि.परभणी) : जिंतूर-औंढा महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकी परस्पर भिडल्याने झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना शहरापासून चार किलोमीटरवर रविवारी दुपारनंतर चारच्या सुमारास घडली. जखमींना येथील शासकीय रुग्णालयातील प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलविण्यात आले. घटनेत दोन्ही दुचाकी भरधाव वेगात परस्पर भिडल्याने अपघात झाला. (Three People Injured In Accident In Jintur Of Parbhani)

अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, पोलीस कर्मचारी शेख शकील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत पडलेले अमर हरिभाऊ जगताप (वय २३ रा.पुंगळा ता.जिंतूर), अनिता साहेबराव शेरे (३०), साहेबराव गोरख शेरे (३५, दोघे रा. घाटनादुर ता.आंबेजोगाई) यांना अमोल देशमुख, नागेश आकात यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. डाॅ.गजानन काळे, गंगाधर पालवे, बालाजी नेटके, कटारे, सिस्टर शिंदे आदींनी प्राथमिक उपचार केले.

साहेबराव शेरे यांच्या उजव्या पायाला गंभीर मार लागला. अनिता शेरे यांनाही बराच मुक्का मार लागलेला असून या पती पत्नीस नांदेड रुग्णालयात, तर अमर जगताप यांना डोक्याला, पायाला मार लागल्याने परभणी (Parbhani) जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची पोलिस ठाण्यात सदरील घटनेची नोंद झाली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT