Transgender, Shiv Jayanti Udgir
Transgender, Shiv Jayanti Udgir  
मराठवाडा

तृतीयपंथी म्हणतात, राजे.. तुम्ही असता, तर न्याय मिळाला असता!

सचिन शिवशेट्टे

उदगीर (जि.लातूर) : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात जन्मोत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात उदगीर शहरातून बुधवारी (ता. १९ ) काढण्यात आलेल्या भव्य  मिरवणूकीत तृतीयपंथीयांच्या सहभागाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी हातात फलक घेऊन `राजे... तुम्ही असता तर... आम्हाला न्याय मिळाला असता..!' असे घोषण देत आपल्या व्यथा मांडल्या.

एरवी तृतीयपंथीयांकडे हिडीस भावनेने पाहीले जाते. समाजाने त्यांना  स्वीकारलेले नसल्याने त्यांचा जागोजागी अवमान केला जातो. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना हात बडवत भटकंती करावी लागते. इतर माणसासारखे त्यांना हक्क अधिकार मिळत नाहीत. त्यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे ? वर्षानुवर्ष शासन दरबारी न्यायावाचून खितपत पडलेल्या समूहाला त्यांच्यासाठी हक्काचे घरकुल, वैयक्तिक शिधापत्रिका, स्वतंत्र स्मशानभूमी, स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य मिळत नाही.

समान न्याय तत्त्वानुसार इतर माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार द्यावा व विविध योजनांचा लाभ देण्यासह आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यात यावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधत त्यांनी बुधवारी  शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी नोंदविला. हातातील फलकाच्या, विविध घोषणांच्या माध्यमातून त्यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनाच व्यथा सांगितले. फलकावरील 'राजे...आज तुम्ही असता तर... आम्हाला न्याय मिळाला असता..! ' असा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यासोबत तृतीयपंथीयांच्या व्यथांही प्रकर्षाने जाणवल्या. मिरवणुकीत तृतीयपंथी राणी अंजली बकश, पिंकी अंजली बकश, वैष्णवी अंजली बकश, आलिया अंजली बकश, पारू अंजली बकश, बानू अंजली बकश  आदी सहभागी झाले होते.

औशात शिवाजी महाराजांची मुस्लिम बांधवांकडून आगळी-वेगळी जयंती साजरी
औसा : औसा शहरातील सम्राट फायरवर्क या फटाक्याच्या व्यवसाय करणाऱ्या आताउल्ला सनाउल्ला शेख यांनी फुलबाजीच्या आतषबाजीत शिवाजी महाराजांच्या गळ्यात माळ पडते हा अतिषबाजीचा देखावा सादर केला. यंदा शिवजयंतीसाठी शहरातील मुस्लिम युवकांनी रक्तदान, फेरी व शिवचरित्रावर व्याख्याने ठेऊन रयतेच्या राजाला अभिवादन केले. बुधवारी रात्री येथील फटाके व्यापारी आताउल्ला शेख यांनी फुलबाजीच्या अतिषबाजीत शिवाजी महाराजांचे छायाचित्र लाकडाच्या कमानीवर बसविला होता. फुलबाजी पेटल्यावर फुलबाजीच्या मध्यभागी रोल केलेल्या शिवाजी महाराजांचे छायाचित्र उघडतो आणि त्यांच्या गळ्यात माळ पडते हा देखावा सादर करून शिवरायांना आगळी-वेगळी सलामी दिली. यावेळी हिंदू व मुस्लिम बांधव समाजातील अनेक युवक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT