Tuljapur News Osmanabad 
मराठवाडा

तुळजाभवानी मातेचे दर्शन ठरले शेवटचे, पुण्याच्या भाविकाचा तुळजापुरात भोवळ येऊन मृत्यू

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१२) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यासंदर्भात मृत भाविकाचे नाव महावीर शामदास परदेशी (वय ७०, राहणार नाना पेठ, पुणे) आहे. श्री.परदेशी यांना भोवळ आली. मंदिरात भाविकांस भोवळ आल्यानंतर तेथील सुरक्षा कर्मचारी आणि भाविकांसोबतच्या नातेवाईकांनी श्री.परदेशी यांना एका खासगी रूग्णालयात नेले.

खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भाविकांस मृत घोषित केले. यासंदर्भात परदेशी यांचे पुजारी गणेश साळुंके यांनी सांगितले की, महावीर परदेशी हे गुरुवारी (ता.११) सकाळीच आले होते. त्यांचा दर्शनाचा कार्यक्रम काल पार पडला. आज शुक्रवारी दुपारी ते परत जाणार होते. श्री परदेशी यांना नगारखाना परिसरात भोवळ आली. त्यांना उपचारासाठी नेण्यात आल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.

परदेशी कुटूंबीय मागील तीन पिढ्यांपासुन दश॔नासाठी येथे येतात. सदरची दुर्घटना घडल्यानंतर त्यांचे पुजारी विकास साळुंके आणि नातेवाईक हे श्री. परदेशी यांचे पार्थिव घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहेत. तहसीलदार तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे सरव्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी या घटनेसंदर्भात पुजारी श्री. साळुंके यांच्याकडे घडलेल्या घटनेबाबत विचारपूस केली आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT