Mini Bus Accident In Beed District 
मराठवाडा

लग्न सोहळा आटोपून कल्याणला जाणारी मिनी बस नगर-बीड मार्गावर पलटी, वीस वऱ्हाडी जखमी

निसार शेख

कडा (जि.बीड) : आष्टी तालुक्यातून जाणाऱ्या अहमदनगर-बीड राज्यमार्गावरील कडा हद्दीतील हॉटेल ग्रीनपार्क समोरील पुलाला भरधाव वेगाने येणारी मिनीबस धडकून पलटी होऊन झालेल्या अपघातात सुमारे अठरा ते वीस वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.१८) रात्री आठ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास घडली आहे. कल्याण येथून बावदान ट्रॅव्हल्स कंपनीची (एमएच ०५ डीके ६१२५)  मिनीबसने पिंपळगाव जामखेड (जि.अहमदनगर) येथे दुपारी लग्न समारंभ उरकून परत भरधाव वेगाने कल्याण येथे जात असताना चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटून कडा हद्दीतील हॉटेल ग्रीनपार्क समोरील पुलाला धडकून पलटी झाली.

या मिनी बसमध्ये वीस जण वऱ्हाडी प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये श्रवण बनसोडे, विघ्नेश बनसोडे, कवू कांबळे, महेर बनसोडे, चंची बनसोडे, राजाबाई डाडर, सुनील पवार, धोंडूबाई जाधव, विराज जाधव, चालक कनिराम राठोड यांच्यासह वीस जण गंभीर जखमी झाले आहेत. सदरील मिनी बस अहमदनगर-बीड महामार्गावर आडवी झाल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती. 

जखमींना कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर गंभीर जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी तसेच कडा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, जयेश कदम, बंटी गायकवाड यांच्यासह या मार्गाने प्रवास करणाऱ्या काही व्यक्तींनी जखमींना मदत केली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं सलग तिसऱ्या दिवशी स्वस्त! चांदीच्या भावतही घसरण; आजचा ताजा भाव पाहा

Satara Rain: साताऱ्यात पावसाची दमदार हजेरी! महाबळेश्वरमध्ये १६८ मि.मी. मुसळधार; पश्चिम भाग ओलाचिंब, पूर्वेकडील तालुक्यांत प्रतीक्षा

Latest Marathi News Live Update : घोरावडी रेल्वे स्थानकाजवळ पाण्यात अडकलेल्या बसमधील ३७ प्रवाशांची एनडीआरएफकडून सुखरूप सुटका

बॉलीवूडची पुन्हा एकदा 'कॉपी पेस्ट'? आलिया-शर्वरीचा 'अल्फा' रिलीज होताच ट्रोलर्सच्या निशाण्यावर; नेटकरी म्हणाले...

Pandharpur News : पंढरपुरात धार्मिक स्थळावर दगडफेक, शहरात तणावाचे वातावरण; पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT