4water_213.jpg 
मराठवाडा

देवणी तालूक्यात ह्र्दयद्रावक घटना : नदीच्या पात्रात सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू 

बाबासाहेब उमाटे

देवणी (जि. लातूर) : हिसामनगर (ता. देवणी) येथील मांजरा नदीपात्रातील खड्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. ५) रात्री उशीरा दोन्ही भावडांचे मृतदेह ग्रामस्थांनी बाहेर काढले.  

हिसामनगर गावापासून हाकेच्या अंतरावरुन मांजरा नदी वाहते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदिपात्रातील बहुतांश खड्यात पाणी साचले आहे. या खड्यात गेल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने यश माधव वाघमारे (वय ११) व कार्तिक माधव वाघमारे या दोन्ही सख्या भावडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन वर्षापुर्वींच आईचा मृत्यू झाला होता. 

वडील माधव वाघमारे वलांडीसह परिसरात हमाली करतात. आजोबा शेळ्या राखतात. मंगळवारी सकाळी आजोबा शेळ्या राखण्यासाठी मांजरा नदीकाठच्या भागात गेले होते. या दरम्यान ही दोन्ही भावंडे खाऊसाठी पैसे आणण्यासाठी आजोबाच्या शोधात नदीपात्रात गेले होते. मात्र नदीपात्रात वाळु उपसा झाल्याने पडलेल्या मोठ्या खड्यात ही दोन्ही चिमुकली पडुन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रात्र झाली तरी मुले घरी न आल्याने शोधाशोध सुरु केला. ते नदीपात्राक मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मृतदेहावर देवणी ग्रामीण रुग्णालयात बुधवारी (ता. ०५) दुपारी शवविच्छेदन करण्यात आले.  देवणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

दोनच वर्षांपुर्वी आईचे अल्पआजाराने निधन झाले. अन आता दोन्ही चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अतिशय हालाकीच्या स्थितीत जीवन जगत वाघमारे कुटुंबीयांनी दोन्ही चिमुकल्याचा संगोपन केले होते. मोठा यश वाघमारे हा लातूरला शिक्षणासाठी होता. तर छोटा गावीच राहत. माधव वाघमारे यांनी हमाली करीत आपल्या चिमुकल्यांचे लाड पुरवीले होते. अन मांजरा नदीच्या विशाल पात्राने या दोन्हीना काळाच्या पडद्याआड लोटल्याने गावावर शोककळा पसरली आहे. 

संपादन-प्रताप अवचार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता वाढला, सात महिन्यांची थकबाकीही मिळणार

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू! रक्षाबंधनापासून अंमलबजावणी, राज्य शासनाची अधिसूचना जारी

IND vs SL, Test: भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर! चौथ्या दिवशी फलंदाजी गडबडली, पण गोलंदाजांनी राखले वर्चस्व

Marathi News Live : PM CARES Fund चा लेखापरीक्षण अहवाल सरकारकडून सार्वजनिक

Mangalwedha News : मंगळवेढ्यात धनश्री मल्टीस्टेटने गाठला 1500 कोटी ठेवींचा टप्पा

SCROLL FOR NEXT