file photo 
मराठवाडा

नांदेड जिल्ह्यात दोन कर्मचाऱ्यांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शासकिय कामात अडथळा निर्माण करून दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटना भोकर तालुक्यातील पिंपळकौठा (मगरे) व नांदेड शहरात सोमवारी (ता. १७) घडल्या आहेत. या प्रकरणी भोकर व इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यात एकजण महावितरण तर दुसरा महापालिकेचा कर वसुली कर्मचारी आहे. 

भोकर तालुक्यातील पिंपळकौठा (मगरे) येथे महावितरणचे कर्मचारी दत्ता सुभाषराव मेनकुदळे हे आपल्या कार्यक्षेत्रातील वीजचोरीवर आळा घालण्यासाठी सोमवारी (ता. १७) गेले होते. यावेळी त्यांना वामन वंजारे हे आपल्या घरी विज चोरी करत असल्याचे आढळून आले. त्यांचा आकोडा त्यांनी जप्त करून त्यांना पाच हजाराचा दंड आकारला. दंड का आकारला म्हणून वामन वंजारे व त्यांचा मुलगा  विनोद वामन वंजारे यांनी दत्ता मेनकुदळे यांच्याशी वाद घालून त्यांना शिविगाळ केली. तसेच थापड बुक्यानी मारहाण करून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेनंतर श्री. मनकुदळे यांनी भोकर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरुन वामन वंजारे व विनोद वंजारेविरुद्ध शासकिय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. हणवते करत आहेत. 

महापालिकेच्या करवसुली लिपिकास मारहाण

तर दुसऱ्या घटनेत नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या झोन क्रमांक चारमध्ये कर वसुली लिपीक शेख रफीक मोहमद खाजा हे कार्यरत आहेत. ते आपल्या वरिष्ठांच्या आदेशावरून त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नगरामध्ये कर वसुली करण्यासाठी सोमवारी (ता. १७) गेले होते. कर वसुली करत असतांना अली खान कादरी हे त्यांच्याजवळ गेले. त्यानंतर तु मला अहवाल का देत नाहीस असे म्हणून वाद घातला. एवढेच नाही तर चक्क श्री. कादरी याने शेख रफिक यांना शिविगाळ करत मारहाण केली. शासकिय कामात अडथळा निर्माण करून परिसरात दहशत पसरविली. तसेच या भागात पुन्हा आला तर याद राख असे म्हणून धमकी दिली. शेख रफिक यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. पठाण करत आहेत.

मारहाण करणे गंभीर गुन्हा आहे

शासकिय कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. तरीसुद्धा या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने कर्मचारी भितीच्या वातावरणात शासकिय काम करत आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे पोलिस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले तब्बल 14.10 कोटी रुपये! ‘या’ मल्टिबॅगर शेअरने 6 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल

घसरलेल्या टीआरपीने स्टार प्रवाह हादरलं ! 'ठरलं तर मग'सकट तीन मालिकांची वेळच बदलली

Nature Painting Movement : दर शनिवारी रंगतो निसर्गाचा सोहळा; ३५ हून अधिक चित्रकारांची जलसंवर्धनासाठी अनोखी मोहीम

Nashik Farmer : कर्जमाफीसाठी शेवटचे २ दिवस! ८ हजार शेतकऱ्यांनी कागदपत्रे न दिल्यास लाभापासून मुकणार

T20 World Cup:'...तरच अभिषेक शर्माला फलंदाज समजेल', IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजाचं चॅलेंज

SCROLL FOR NEXT