Hingoli Accident Sakal
मराठवाडा

पोलिस भरतीची स्वप्न राहिले अधुरे, सराव करत असताना दोघा तरुणांचा अपघात

अनिल आणि गणेश हे दोघे तरुण पोलिस भरतीची तयारी करत होते. आणि अचानक...

पंजाब नवघरे

वसमत (जि.हिंगोली) : कौठारोड भागात पोलिस भरतीच्या सरावासाठी गेलेल्या दोन तरुणांचा वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.२) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिल भगवान आम्ले (वय २३, शामनगर, वसमत) व गणेश परमेश्वर गायकवाड (वय १८, पौर्णिमा नगर, कौठा रोड, वसमत) अशी मृत तरुणांची नावे आहेत. राज्यात सध्या पोलिस भरती (Police Recruitment) प्रक्रिया व सैन्यभरती प्रक्रिया सुरु होणार असल्याने तरुण मंडळी दररोज पहाटे चार वाजल्यापासूनच भरतीचा सराव करीत आहेत. (Two Young Men Preparing For Police Recruitment, But Both Died In Accident In Vasmat Of Hingoli)

दररोज धावण्याचा सराव केला जात आहे. वसमत शहरातून किमान ५० ते १०० तरुण भरतीचा सराव करीत आहेत. दरम्यान, आज पहाटे शहरातील काही तरुण कौठा रोडवर धावण्याच्या सरावासाठी गेले होते. यावेळी काही तरुण समोर धावत होते तर अनिल आम्ले व गणेश गायकवाड हे दोघे सोबत धावत होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने दोघांनीही जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहन चालकाने वाहनासह पळ काढला. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सोबत असलेल्या तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Hingoli Accident News)

तरुणांनी रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही रुग्णवाहिकेद्वारे वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रकांत कदम, जमादार भगीरथ सवंडकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत वसमत (Vasmat) शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT