corona 12.jpg
corona 12.jpg 
मराठवाडा

CoronaVirus : उमरग्यात तीन वृद्धांचा मृत्यू, बाधितांची संख्या दीड हजारावर  

अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : कोरोना संसर्ग शहर व तालुक्यात वाढतच चालला आहे. उमरग्यातील इंद्रधनू वृद्ध सेवा केंद्रातील पॉझिटिव्ह जेष्ठांची संख्या वीसवर गेली आहे. त्यातील ६६ वर्षीय महिलेचा शुक्रवारी (ता.१८) सांयकाळी साडेपाच वाजता कोविड रूग्णालयात मृत्यु झाला. तर पहाटे तीनच्या सुमारास कदेर येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा व सांयकाळी सातच्या सुमारास मुरूम येथील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गुरूवारी (ता.१७) अन्टीजेनच्या चाचणीत दहा तर आरटीपीसीआर अहवालात तब्बल ४६ पॉझिटिव्ह आढळून आल्याने चोवीस तासात ५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत ८१ दिवसात उमरगा तालुक्यातील रुग्णसंख्या १,५८३ झाली आहे.

लातूर-गुलबर्गा मार्गालगत असलेल्या इंद्रधनू वृद्ध सेवा केंद्रात प्रारंभी आठ जेष्ठासह पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर बारा जेष्ठांना लागन झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यातील एका जेष्ठ महिलेच्या मृत्यूची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान कदेरच्या व्यक्तीचा पहाटे तर मुरूम येथील रुग्णाचा मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अन्टीजेनचा अहवाल निगेटिव्ह होता. आता स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

पंचायत समितीतील तब्बल चौदा कर्मचारी पॉझिटिव्ह
पंचायत समितीतील कृषी विस्तार अधिकारी, रोखपाल, लिपीक व एक शिपाई बाधित आढळून आल्यानंतर मंगळवारी (ता.१५) कर्मचाऱ्यांचा स्वॅब तपासणीला दिला होता. त्याचा  नऊ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले तर गुरूवारी घेतलेल्या अन्टीजेनच्या चाचणीत एक कर्मचारी व कुटुंबातील तीन सदस्य पॉझिटिव्ह आले. दरम्यान पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढूनही शुक्रवारी (ता.१८) कार्यालय सुरू होते.

एका दिवसात ५६ पॉझिटिव्ह रुग्ण
कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने आरोग्य प्रशासनाने अॅन्टीजेन व स्वॅब पद्धतीनुसार चाचण्या सुरू केल्या आहेत. गुरुवारी घेतलेल्या अन्टीजेनच्या चाचणीत दहा पॉझिटिव्ह आले. त्यात पंचायत समितीशी संबंधित चार, त्रिकोळी व गुंजोटी प्रत्येकी दोन तर कसगी व चिंचकोटा येथील प्रत्येकी एक पॉझिटिव्ह आले. गुरुवारी रात्री उमरगा व मुरूम येथून गेलेल्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला त्यात तब्बल ४६ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात शहरातील सतरा असून एका खाजगी रुग्णालयातील चार, जवाहर व शास्त्रीनगर आठ, बालाजी नगर तीन, जूनी पेठ, महाजन गल्ली प्रत्येकी एक तर मूरळी, तुगांव प्रत्येकी दोन, मातोळा, तुरोरी प्रत्येकी व कदेर येथे तब्बल सोळा जण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान उमरगा पोलिस ठाण्यातील एक पोलिस उपनिरीक्षक पॉझिटिव्ह आले होते. शुक्रवारी अन्टीजेनच्या अहवालात दुसऱ्या एका पोलिस उपनिरीक्षकाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रुग्णांची संख्या सोळाशेच्या उंबरठ्यावर !
८१ दिवसात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गुरूवारी (ता.१७) सांयकाळपर्यंत एक हजार ५८३ रुग्णसंख्या झाली आहे त्यात शहरात ७५७, ग्रामीण ८२९, रोगमूक्त एक हजार १३८, मृत्यू ४२ तर उपचारासाठी ४०८ रुग्ण आहेत. दरम्यान आतापर्यत दोन हजार ८७१ अन्टीजेनच्या चाचण्या झाल्या त्यात २७० बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT