corona death.jpg 
मराठवाडा

Corona Update : उदगीरात कोरोनाने दोघांचा, सारीने एकाचा मृत्यू; आज ३१ पॉझिटिव्हची वाढ 

युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : येथील रुग्णालयात शुक्रवारी (ता.७) दोन जणांचा कोरोनाने तर एकाचा सारीने मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी तब्बल एकतीस कोरोना बाधित रूणांची वाढ झाली आहे.

येथील कोविंड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या हनुमान कट्टा येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी (ता.७) सव्वा बाराच्या सुमारास तर कवडगाव (ता.अहमदपुर) येथील साठ वर्षे व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हेर (ता. उदगीर) येथील एका ७८ वर्षीय व्यक्तीचा सकाळी दहाच्या सुमारास सारीने मृत्यू झाला आहे. पुन्हा शहर व परिसरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बळीमुळे उदगीर शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्युचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.  परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक बनले आहे. शुक्रवारी  (ता.७} रोजी आलेल्या प्रयोगशाळेच्या अहवालात ३ तर रॅपिड एंटीजन तपासणीच्या अहवालात २८ अशा एकुण ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

सद्या येथील कोरोना रुग्णालयात उदगीर ४७१, जळकोट ५, निलंगा २, अहमदपूर ७, मुंबई ३, चाकूर ७, हैदराबाद १, मुखेड ६, देवणी १५, बिदर ५, पुणे १ शिरूर अनंतपाळ १ अशा  कोरोणाची बाधा झालेल्या एकुण ५२३ रुग्णांची नोंद झाली आहे. पैकी ३२ जणांचा मृत्यू झाला झाला आहे. यापैकी २४४ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे.७७ रुग्णांना उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

सध्या कोविंड रुग्णालयात ६४ तर तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे ५४ रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सतिश हरिदास व कोव्हिड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

संपादन-प्रताप अवचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

SCROLL FOR NEXT