crime news crime news
मराठवाडा

‘डोळे वटारून काय बघतोय’ म्हटल्यामुळे तरुणाचा खून

फोनवर बोलताना नाटकरे याने कमरेला असलेला चाकू काढून जगदीशच्या पोटात वार केला

सकाळ वृत्तसेवा

उदगीर (लातूर): ‘दादा, डोळे वटारून काय बघतोय?’ असे विचारल्यामुळे एकाने तरुणाला चाकूने भोसकले. ही घटना गुरुवारी (ता.२९) रात्री येथील रेल्वेस्टेशनजवळील बसवेश्वर चौकाजवळ घडली. या प्रकरणी शुक्रवारी (ता. ३०) शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. जगदीश किंवडे असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी सुनीता विजय किंवडे यांनी तक्रार दिली. त्यांनी तक्रारीत नमूद केले की, त्यांचा मुलगा जगदीशने रेल्वेस्टेशनजवळील बसवेश्वर चौकातील वोडाफोन सेंटरच्या समोरील रस्त्यावर सोन्या नाटकरे (वय ३०) याला ‘‘दादा, माझ्याकडे डोळे वटारून काय बघतोय?’ असे विचारले. तेवढ्यात जगदीशला कोणाचा तरी फोनकॉल आला. फोनवर बोलताना नाटकरे याने कमरेला असलेला चाकू काढून जगदीशच्या पोटात वार केला. यात जगदीश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी लातूरला नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

या तक्रारी आधारे पोलिसांनी नाटकरे याच्या विरोधात गुन्हा नोंद केला. उपविभागीय अधिकारी डॅनियल बेन, पोलिस निरीक्षक गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक व्ही. आय. एडके तपास करीत असून, नाटकरे फरार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : अहमदाबादचं नामांतर कधी? उद्धव ठाकरेंना कळली संघाची अंदर की बात! अमित शहा आणि मोदींबद्दल दिली मोठी अपडेट

UPSC IFS Main Exam 2025: UPSC IFS मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; आता असे करा डाउनलोड

AUS vs IND, 5th T20I: मॅक्सवेलने झेल सोडला अन् अभिषेक शर्माने इतिहास घडवला; सूर्यकुमार अन् केएल राहुलला टाकलं मागे

Latest Marathi News Live Update : शितल तेजवानी राहत्या घरातून फरार; फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांनंतर परदेशात पलायनाची शक्यता

'दशावतार' पाहायचा राहिलाय? आता ओटीटीवर पाहता येणार दिलीप प्रभावळकरांची जादू; कुठे, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

SCROLL FOR NEXT