download.jpg 
मराठवाडा

Corona Update : उमरग्यात आज २३ पॉझिटिव्हची भर, २४० रुग्णांनी केली कोरोनावर मात 

अविनाश काळे

उमरगा ( उस्मानाबाद) :  उमरगा शहर व ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या दहा-बारा दिवसात तर दररोज पॉझिटिव्ह रूग्ण दोन अंकी संख्येने येत आहेत. मंगळवारी (ता.चार) पाठविलेल्या तीस स्वॅबचा अहवाल उशीरा म्हणजे गुरुवारी (ता. सहा) सांयकाळी प्राप्त झाला असून त्यात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चाळीस दिवसात रुग्ण संख्या ४८९ पर्यंत पोहचली आहे. 

शहर व तालुक्यात मंगळवारी रात्री २७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते. बुधवारी दुपारी अन्टीजेट टेस्टमध्ये पाच पॉझिटिव्ह आढळून आले होते. मंगळवारी मुरूम येथून पाठविलेल्या स्वॅबपैकी बुधवारी रात्री दोघांचा पॉझिटिव्ह अहवाल आला मात्र उमरगा येथून पाठविलेल्या तीस जणांच्या स्वॅबचा अहवाल प्रलंबित होता तो गुरुवारी सांयकाळी प्राप्त झाला. त्यात २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात शहरात ३३७ तर ग्रामीणमध्ये १५२  संख्वा झाली आहे. त्यात पंधरा जणांचा मृत्यू झाला असून २४० रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सध्या उपचारासाठी २३४ रुग्ण दाखल आहेत.

शहरातील रूग्ण संख्येत होतेय वाढ

मंगळवारी पाठविलेल्या ३० पैकी २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संसर्गाची गती वाढल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील सोळामध्ये रामनगर -शिवपूरी पाच, मेन रोड चार, गौतमनगर दोन, एसटी कॉलनी, दत्त कॉलनी, भिमनगर, शिवपुरी रोड येथील प्रत्येकी एक तर पॉझिटिव्ह मध्ये आमदाराच्या भावाचा व उपजिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

ग्रामिणमध्ये कोरेगाव तीन, तर माडजमध्ये दोघे पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान मुरूममध्ये गुरूवारी घेतलेल्या अन्टीजेंटमध्ये दोघे पॉझिटिव्ह आले आहेत. उमरग्यातून बुधवारी पाठविलेल्या २९ स्वॅबचा अहवाल गूरूवारी रात्री उशीरा प्राप्त होईल. तर गुरूवारी ७२ स्वॅब पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री प्राप्त होईल.

Edit-Pratap Awachar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ZIM: हारला तर बाहेर, जिंकला तरी टेन्शन कायम! भारताच्या सामन्यावर WI च्या निकालाची छाया, सेमीफायनलचं भवितव्य ठरणार

Solapur News: साेलापूरात केंद्र सरकार अन्‌ भाजपविरुद्ध काँग्रेसची निदर्शने; राहुल गांधींना धमकी, हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याचा निषेध!

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला केंद्राचा 'नो सिग्नल', कारण काय? नव्या मार्गाचा अभ्यास करणार, CM फडणवीसांचं आश्वासन

Latest Marathi News Live Update : दिवाकर रावतेंच्या कार्यकाळात सुरू झालेल्या शिवशाही बसेस होणार बंद

Kolhapur Dead Body News : कोल्हापुरातील मसाई पठारावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला, काही दिवसांपूर्वी सुरू होते चित्रपटाचे चित्रीकरण

SCROLL FOR NEXT