rain.jpg 
मराठवाडा

अवकाळीचा पावसाचा पुन्हा कहर

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा दणका दिला. सोमवारी (ता. ३०) रात्री नांदेड शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस नांदेड तालुक्यातील लिंबगाव मंडळात ३५ मिलिमीटर झाला. तर माहूर मधील वानोळा मंडळात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी साडेआठ पर्यंत जिल्ह्यात एकूण ७१.१५ तर सरासरी ३.९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठराविक कालावधीनंतर अवकाळी
जिल्ह्यात ठराविक कालावधीनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे व गारपीट होत आहे. मागच्या पंधरवड्यात झालेल्या गारपिटीमुळे हदगाव तालुक्यातील दोन हजार आठशे हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान झाले होते. यानंतर काही दिवसाच्या अतंराने पुन्हा अवकाळीचा कहर सुरू झाला. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) रात्री दहाच्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस नांदेड शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात झाला. या पावसामुळे उभ्या पिकाचे तसेच फळपिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. परंतु कृषी विभागाकडून शेतीपिकाचे नुकसान झाले नसल्याची माहिती मिळाली.

जिल्ह्यात मंडळनिहाय झालेला पाऊस 
(मिलीमीटरमध्ये) 
हदगाव पाच, तामसा सात, मनाठा सहा, निवघा दोन, आष्टी दहा, माहूर आठ, वानोळा २०, सिंदखेड आठ, लिंबगाव ३५, तरोडा, नांदेड ग्रामीण प्रत्येकी १२, वजीराबाद दहा,  वसरणी दहा, विष्णुपुरी सात, नांदेड शहर दहा, तुप्पा, किनवट १७, इस्लापूर सात, मांडवी १२, बोधडी १२, जलधारा आठ, मुदखेड १४, बारड १५, मुगट चार, कलंबर सहा, शेवडी सहा, सोनखेड नऊ, कापशी सात, उस्माननगर सहा, भोकर १६, किनी सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तालुकानिहाय झालेला पाऊस
नांदेड १२.६३, मुदखेड अकरा, अर्धापूर ४.६७, भोकर ७.२५, कंधार एक, लोहा पाच, किनवट ८.२५, माहूर ९.७५, हदगाव ४.२८, हिमायतनगर ७, उमरी, देगलूर, धर्माबाद, नायगाव, मुखेड शुन्य. या प्रमाणे जिल्ह्यात एकूण ७१.१५ मिलिमीटर तर सरासरी ३.९१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पिकाचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल 
सध्या गहू व हरभरा पिकांची काढणी झाली आहे. तसेच अवकाळी पावसादरम्यान हवा तसेच गारपीट झाली नाही, यामुळे फळपिके तसेच भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले नसल्याचा अहवाल आला आहे.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

Teacher Recruitment: शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! व्यवस्थापनाच्या वादामुळे रखडलेली शिक्षक भरती आता थेट होणार; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा..

Rahul Dravid Son Samit Dravid: राहुल द्रविडच्या मुलाने मैदानात घातला धुमाकूळ; 360° फटकेबाजीचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT